मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आपल्या बायोपिकसाठी होकार दर्शविला आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारू शकतो. न्यूज18 बांगलाशी संभाषणादरम्यान दादाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअरवर चित्रपट तयार करण्यास सहमती (Sourav Ganguly agrees on his Biopic) दर्शविली आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसह, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावरही चित्रपट बनले आहेत.

क्रिकेटर सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) जीवनावर तयार होणार्‍या या चित्रपटाचे बजेट 200 ते 250 कोटी रुपयांदरम्यान सांगितले जात आहे. याविषयी बोलताना सौरव गांगुलीने सांगितले “हो, मी बायोपिकसाठी होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत असेल. दिग्दर्शकाचे नाव आत्ता तरी सांगणे मला शक्य नाही. सर्व बाबींना अंतिम स्वरुप येणासाठी आणखी काही वेळ लागेल.” (Sourav Ganguly agrees on his Biopic, Ranveer Kapoor on top contention for Lead Role)

माध्यमातील वृत्तांनुसार सौरव गांगुलीच्या बायोपिकची (Sourav Ganguly Biopic) स्क्रिप्ट लिहिली जात आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या सदस्यांनी सौरव गांगुलीची अनेक वेळा भेट घेतली आहे. या बायोपिकमध्ये दादाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील प्रॉडक्शन हाऊसने जवळपास निश्चित केले आहे. या यादीत अभिनेता रणबीर कपूर (Ranveer Kapoor) अव्वल स्थानी आहे. याशिवाय इतर दोन नावांचीही चर्चा आहे. (Sourav Ganguly agrees on his Biopic, Ranveer Kapoor on top contention for Lead Role)

रणबीर कपूरने यापूर्वी संजय दत्तच्या (Sanjay Dutt) बायोपिकमध्येही मुख्य भूमीका साकारली आहे. त्यामुळे तो सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी निर्मात्यांची पहिली पसंती असेल. याशिवाय हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) नावाचीही चर्चा या भूमिकेसाठी सुरू आहे. दरम्यान बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत आपल्यासारखा दिसणारा एखादा अभिनेता असावा असे दादाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते. (Sourav Ganguly agrees on his Biopic, Ranveer Kapoor on top contention for Lead Role)