मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे (team india) माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. रवी शास्त्री यांच्याकडे युवा खेळाडूंना (young players) योग्य दिशा देण्याचे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कौशल्य असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे. 1971 : द बिगनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस’ (1971: The Beginning of India’s Cricketing Greatness’) या पुस्तकाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात सुनील गावसकर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यानी रवि शास्त्रीचे हे कौतुक केले आहे.Also Read - India vs South Africa T20I: हार्दिक पांड्या बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, जाणून घ्या काय आहे कारण?

रवी शास्त्री यांच्यासोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये 10 ते 15 मिनिटे घालवल्यानंतर तरुण खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची त्यांचे कौशल्य (confidence building skills) तुमच्या लक्षात येईल, असे यावेळी गावसकर म्हणाले. जर शास्त्रींना एखाद्या खेळाडूच्या क्षमतेवर विश्वास असेल तर, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शास्त्रींपेक्षा दुसरी कोणताही चांगली व्यक्ती नाही (no one better than shastri) असेही यावेळी गावस्कर म्हणाले. Also Read - IND vs SL, 2nd Test: भारताचा अख्खा संघ अवघ्या 252 धावांत ऑलआउट, श्रेयस अय्यरचे शतक हुकले

रवी शास्त्रींच्या नावे ऐतिहासिक विक्रम

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Head Coach Ravi Shastri) यांच्या नेतृत्तवात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्या. हा ऐतिहासिक विक्रम करणारे ते एकमेव भारतीय प्रशिक्षक (Historical records of Ravi Shastri) आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये मर्यादीत ओव्हर्सची मालिका देखील जिंकली. भारताने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) सेमी फायनलमध्ये धडक मारली, तेव्हा देखील रवी शास्त्री हेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यानंतर आता शास्त्रींच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये देखील प्रवेश केला आहे. Also Read - IND vs SL, 1st Test: रोहितच्या कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात पूर्णपणे वेगळी असेल टीम इंडिया, हे असतील प्लेइंग-11

बॉलिंग कोच भरत अरुण यांचीही प्रशंसा

सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bowling coach Bharat Arun) यांचीही प्रशंसा केली आहे. “ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कोणत्याही फास्ट बॉलर्सशी तुम्ही चर्चा केली तर ते भरत अरुण यांची प्रशंसा करतील आणि त्यांनी कसे मार्गदर्शन केले हे सांगतील,” असं गावसकर यांनी म्हटले आहे. तसेच गावसकर यांनी तरुण खेळाडूंना शास्त्री आणि अरुण यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालून त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.