मुंबई : यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी -20 विश्वचषक (T20 World Cup)आता भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सोमवारी याविषयी माहिती दिली आहे. गांगुली यांनी सांगितले की बीसीसीआयने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं आरोग्यासंदर्भातील चिंता लक्षात घेऊन टी-20 विश्वचषक भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.Also Read - IND vs ENG : इंग्लंड दौऱ्या आधीच टीम इंडियाला मोठा झटका, टीमच्या बाहेर जाऊ शकतो 'हा' धडाकेबाज खेळाडू

सौरव गांगुलीने पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) अधिकृतपणे सांगितले आहे की, टी-20 विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थानांतरित केला जाऊ शकतो. या संदर्भात तपशील तयार केला जात आहे. आयसीसीने बीसीसीआयला कोविड 19 परिस्थिती पाहता भारत या स्पर्धेचे आयोजन करू शकेल की नाही हे ठरवण्यासाठी आणि त्यांना याविषयी कळवण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला चार आठवड्यांची मुदत दिली होती. Also Read - IPL media rights: बीसीसीआयची आत्तापर्यंत 46000 कोटींची बक्कळ कमाई, आयपीएल बनली जगातील सर्वात श्रीमंत लीग

Also Read - IPL Media Rights : आयपीएल मीडिया राईट्ससाठी ई- ऑक्शन सुरु, अनेक दिग्गज कंपन्या मैदानात

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्थगित केल्यानंतर ही स्पर्धा युएईमध्ये हलविली जाऊ शकते, अशी माहिती पीटीआयने 4 मे रोजी सर्वप्रथम दिली होती. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर तशी शक्यता निर्माण झाली होती. आता बीसीसीआयने अधिकृतपणे ही स्पर्धा  युएईमध्ये होईल अशी माहिती दिली आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही आयसीसीला कळवले आहे की ही स्पर्धा युएईमध्ये होईल. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याला आमची पहिली प्राथमिकता होती. मात्र, पुढील 2-3 महिन्यात कोविडची स्थिती काय असेल हे कोणालाही माहिती नाही. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या तारखा पूर्वी ठरवल्या प्रमाणेच असतील”.

राजीव शुक्ला म्हणाले की, “स्पर्धेचे क्वॉलीफायर्स सामने ओमान येथे होऊ शकतात, तर उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर होतील.” ते म्हणाले की भारतानंतर युएई हेच एक आदर्श ठिकाण होते जिथे ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकेल.