मुंबई: बीसीसीआयने आज टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची (Team India T20 World Cup 2021 Squad) घोषणा केली आहे. सीनियर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) 4 वर्षानंतर टी-20 संघात पुनरागमन झालं आहे. याशिवाय युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना मात्र संघात स्थान मिळू शकले नाही. युवा खेळाडू राहुल चाहरची (Rahul Chahar) संघात लेग स्पिनर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा डावखुरे फिरकीपटू म्हणून संघाचा भाग असतील.Also Read - IPL 2021: विराट कोहलीची पुन्हा मोठी घोषणा, IPLनंतर RCBचेही कॅप्टन पद सोडणार!

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील या संघाला माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) मार्गदर्शन मिळणार आहे. निवड समितीने धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. मात्र या संघ निवडीमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना धक्का बसला आहे. श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडलेला शिखर धवन (Shikhar Dhawan) टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाच्या बाहेर गेला आहे. त्याचबरोबर सलामीवीर पृथ्वी शॉलाही (Prithvi Shaw) या संघात स्थान मिळाले नाही. Also Read - T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकानंतर Ravi Shastri सोडू शकतात मुख्य प्रशिक्षकपद; म्हणाले...

Also Read - BIG NEWS: क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, विराट कोहलीने सोडले कॅप्टन पद!

दुसरीकडे, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती देखील संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. भारताच्या या 15 सदस्यीय संघात 4 विशेषज्ञ फलंदाज, 3 वेगवान गोलंदाज, 2 यष्टीरक्षक फलंदाज, एक अष्टपैलू आणि 5 फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि दीपक चहर (Deepak Chahar) यांना राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs Pakistan T20 World Cup) विरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल. तर दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे.

टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार) केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (WK), ईशान किशन (WK), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय निवड समितीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत व्हर्चुअल कॉन्फरन्स घेऊन या संघाची निवड केली. विराट मँचेस्टर येथून या बैठकीत सामील झाला होता.