Top Recommended Stories

Team India Schedule: फेब्रुवारी 2022 मध्ये भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार 7 सामने, पाहा कधी, कुठे, कोणाशी लढत?

Team India Full Schedule in February 2022: जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक दौरा संपल्यानंतर टीम इंडिया फेब्रुवारीपासून देशांतर्गत सामने खेळणार आहे.

Published: January 31, 2022 8:45 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Team India Schedule: फेब्रुवारी 2022 मध्ये भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार 7 सामने, पाहा कधी, कुठे, कोणाशी लढत?
Team India Full Schedule in February 2022

Team India Full Schedule in February 2022: जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक दौरा संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) फेब्रुवारीपासून देशांतर्गत सामने खेळणार आहे. नवीन महिन्यात पहिले 5 दिवस कोणतेही सामने नसले तरी 6 फेब्रुवारीपासून म्हणजेच रविवारपासून टीम इंडिया वेस्ट इंडिजचे (India vs West Indies) यजमानपद भूषवताना दिसेल. या दौऱ्यावर कॅरेबियन संघ भारतात 3 वनडे (ODI Series 2022) आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका (T20i Series 2022) खेळण्यासाठी येत आहे.

Also Read:

भारताने आता मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून निवड केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रोहितकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्यामुळे भारताने केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळली. या 3 सामन्यांच्या मालिकेत भारताला 3-0 ने पराभव स्विकारावा लागला.

You may like to read

आता नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पुढे नेण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय संघ विंडीजविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका पूर्ण करून श्रीलंकेचे यजमानपद भूषवतानाही दिसणार आहे. भारत श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका फेब्रुवारीमध्येच सुरू होणार असून मार्चच्या मध्यापर्यंत हा दौरा सुरू राहणार आहे.

भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील नवीन वेळापत्रकावरून हेही स्पष्ट झाले आहे की विराट कोहलीने (Virat Kohli) पद सोडल्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बीसीसीआय (BCCI) नवीन कसोटी कर्णधाराची नियुक्ती करेल. जोपर्यंत बोर्ड नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करत नाही तोपर्यंत नवा कर्णधार म्हणून वेगवेगळ्या चेहऱ्यांवर चर्चा सुरूच राहतील.

हे आहे फेब्रुवारीमधील भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक :-

वेस्ट इंडिजचा भारत दौरा – तीन वनडे सामन्यांची मालिका (IND vs WI ODI Series 2022):-

पहिली वनडे – 06 फेब्रुवारी, रविवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.
दुसरी वनडे – 09 फेब्रुवारी, बुधवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.
तिसरी वनडे – 11 फेब्रुवारी, शुक्रवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.

तीन वनडे टी-20 सामन्यांची मालिका (IND vs WI T20i Series 2022)

पहिला T20I – 16 फेब्रुवारी, बुधवार, ईडन गार्डन्स, कोलकाता – संध्याकाळी 7.30 वाजता.
दुसरा T20I – 18 फेब्रुवारी, शुक्रवार, ईडन गार्डन्स, कोलकाता – संध्याकाळी 7.30 वाजता.
तिसरा T20I – 20 फेब्रुवारी, रविवार, ईडन गार्डन्स, कोलकाता – संध्याकाळी 7.30 वाजता.

भारताचा श्रीलंका दौरा – 2 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका:-

पहिली कसोटी – 25 फेब्रुवारी ते 1 मार्च, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू – सकाळी 9.30 वाजता

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 31, 2022 8:45 PM IST