मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय पुरुष हॉकी संघाने (India Mens Hockey Team) दमदार कामगिरी केली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीच्या संघाचा (Germany Mens Hockey Team) 5-4 ने पराभव केला. भारतीय संघाने तब्बल 41 वर्षानंतर ऐतिहासिक कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये (Olympics) पदक जिंकले आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्य पदक (Bronz Medal) जिंकले आहे. याआधी 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये (Moscow Olympics)भारतीय संघाने सुवर्ण पदक (Gold Medal) आपल्या नावावर केले होते.Also Read - Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्यांचा BCCI करणार सत्कार, जाणून घ्या कोणाला किती रक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार!

या सामन्याध्ये जर्मनीने चांगली सुरुवात केली. जर्मनीच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटामध्ये गोल केले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये एका गोलची आघाडी राखल्यानंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत आपले खाते उघडले होते. पण यानंतर जर्मनीने बॅक टू बॅक दोन गोल करत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. Also Read - Tokyo Olympics 2020: सूवर्ण पदक पटकावल्यानंतर असा भावुक झाला नीरज चोप्रा, पाहा संस्मरणीय फोटो

भारताने देखील याच क्वॉर्टरमध्ये जर्मनीची आघाडी काढून टाकली आणि भारताने दोन क्वॉर्टरनंतर स्कोअर 3-3 अशा बरोबरीने आणला. खेळाच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने या क्षणाचे महत्त्व ओळखून जर्मनीवरील दबाव वाढवला. या क्वॉर्टरमध्ये भारताने जर्मनीवर 2 गोल करून दबाव आणला. या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने 5-3 अशी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली होती. यानंतर जर्ननीच्या संघाने देखील आशा सोडल्या नाही. त्यांनी पुन्हा एक गोल केला आणि सामना 5-4 वर आला. पण त्यानंतर जर्मनीच्या संघाला एकही गोल करता आला नाही आणि भारतीय संघाचा विजय झाला. Also Read - Gold Medal विजेत्या नीरज चोप्राला XUV700 गिफ्ट करणार आनंद महिंद्रा, खास शैलीत केला घोषणा

1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर भारताला या खेळातून कोणतेही ऑलिम्पिक पदक मिळवता आले नाही. पण यावेळी भारताने हे स्वप्न पूर्ण केले आहे. तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. ऑलिम्पिक इतिहासात 8 सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताचे हे तिसरे कांस्य पदक आहे. भारतीय हॉकी संघाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांचे कौतुक केले आहे.