मणिपूर: टोकियो ऑलिम्पिक खेळांमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिनं इतिहास रचला. रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मायदेशात परतल्यानंतर मीराबाईवर विविध क्षेत्रांतून तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत सोबतच तिला अनेक बक्षीसंही दिली जात आहेत. त्यातच तिला मिळालेलं मोठं गिफ्ट म्हणजे तिची अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी (Additional Superintendent of Police (Sports) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मीराबाईला तीन कोटी रुपयांचे बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. मणिपूर सरकारकडून ( Manipur Government) सहकार्य मिळालं नसतं तर आपलं पोलिस अधीक्षक बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं, असं मीराबाईनं सांगितलं.Also Read - CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाने 67 किलोमध्ये जिंकले सुवर्ण, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक

वृत्तसंस्था ‘एएनआय’ दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर सरकारनं ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिची नियुक्ती अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी केली आहे. मणिपूर सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी यासंदर्भात माहिती देण्यात आली.
Also Read - CWG 2022 : मीराबाई चानूची 'सुवर्ण' कामगिरी, कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलं गोल्ड मेडल!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करून मीराबाई चानू (Mirabai Chanu) भारतात परतली आहे. सातासमुद्रापार दमदार कामगिरी करणाऱ्या मीराबाईचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गेल्या 5 वर्षांपासून आपण टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी केली होती, असं मीराबाईनं मीडिशाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितलं. Also Read - CWG 2022: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक, संकेतनंतर गुरुराजा पुजारीने पटकावले कांस्य

मीराबाई चानूला सूवर्णपदक मिळण्याची शक्यता!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूला सूवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. कारण वेटलिफ्टिंगमध्ये सूवर्णपदक जिंकणारी चीनची हौ झीहू (Zhihui Hou) हिची डोपिंग टेस्ट होणार आहे. या डोपिंग टेस्टमध्ये झीयू हौ पॉझिटिव्ह आढळून आल्यास नियमानुसार दुसऱ्या क्रमांकावरील विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूला सूवर्णपदक मिळू शकतं.

झीयू हौ हिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास मीराबाई सूवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. ‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार, झीयू हौ हिला टोकियोमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे. तिची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे.