टोक्यो : टोक्यो पैरालिंपिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतासाठी सोमवारचा दिवस विशेष ठरला आहे. दिवसाच्या सुरुवातीला नेमबाजीत (shooting) अवनी लखेडाने (Avani Lakhera) 10 मीटर एअर रायफल एसएच-1 मध्ये भरताला पहिले गोल्ड मेडल (Gold medal) मिळवून दिले तर दिवसाच्या अखेरीस भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) F64 फाइनल कॅटिगरीमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण पदक (Gold medal) मिळवून दिले आहे. सुमितने सुवर्ण पदकाला गवसणी घालताना एक विश्वविक्रमही (World record) मोडला आहे. त्याने एफ-64 प्रकारात 68.55 मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी भालाफेक (Javelin Throw) AF 46 मध्ये देवेंद्र झझारिया आणि सुंदर सिंह गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक मिळवले होते.Also Read - Tokyo Paralympics: नेमबाजीमध्ये डबल धमाका, मनीष नरवालाने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदकावर कोरले नाव!

Also Read - Tokyo Paralympics 2020: भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं पदक घेतलं काढून; भारताच्या पदकांची संख्या 7 वरून 6 वर

सुमित अंतिलने स्पर्धेत जेवढ्या अंतरावर भाला फेकला त्यामुळे त्याच्या नावावर एक नवा विश्वविक्रम झाला आहे. सुमित या दरम्यान तीन वेळा विश्वविक्रम केला आहे. त्याने पहिल्यांदा 66.95 मीटर, दुसऱ्यांदा 68.08 मीटर आणि नंतर 5 व्या आणि शेवटच्या वेळी 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला. सुमितच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक पडले आहे. या पदकासह टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 वर पोहोचली आहे. (Indian Javelin Thrower Sumil Antil Wins Gold Medal in Javelin Throw AF 46; India wins second gold with world record) Also Read - Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी दोन पदकं; निषादची रौप्य तर विनोद कुमारची कांस्य पदकाची कमाई

भारताला आजच्या दिवसात दुसरे सुवर्ण पदक

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली असून त्यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच नेमबाजीत अवनी लखेडाने 10 मीटर एअर रायफल एसएच-1 मध्ये भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले. त्यानंतर सुमितनेही ऐतिहासिक कामगिरी करत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. दरम्यान, रविवारी भारताच्या खात्यात तीन पदक आले होते. मात्र त्यातील थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे पदक काढून घेण्यात आले. (Indian Javelin Thrower Sumil Antil Wins Gold Medal in Javelin Throw AF 46; India wins second gold with world record)