नवी दिल्ली : टोक्यो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics 2020) स्पर्धेत रविवारी भारताच्या खाद्यात तीन पदकं पडली. भारतीय खेळाडूंनी देशाला दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवून दिले. सकाळी टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने (Bhavina Patel) पहिले रौप्यपद जिंकले. त्यांनंतर संध्याकाळी निषाद कुमारने (Nishad Kumar) उंच उडीत रौप्य पदकाची कमाई केली आणि दिवसाचा शेवट माजी सैनिक विनोद कुमार (Vinod Kumar) यांनी डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकून साजरा केला.Also Read - Tokyo Paralympics: नेमबाजीमध्ये डबल धमाका, मनीष नरवालाने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदकावर कोरले नाव!

निषाद कुमारने जिंकले रौप्य पदक

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) निषाद कुमारने (Nishad Kumar) भारताला दुसरे रौप्य पदक मिळवून दिले आहे. अॅथलीट निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. निषादने 2.06 मीटर उडी घेऊन पदकाची कामाई केली. यासोबतच निषाद कुमारने ‘एशियन रेकॉर्ड’ देखील बनवले आहे. निषाद कुमारने पहिल्याच प्रयत्नात 2.02 मीटरची उडी घेतली. यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात 2.06 मीटर उंच उडी घेत नवा एशियन विक्रम केला. यानंतर निषादने 2.9 मीटरची उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसऱ्या तिन्ही प्रयत्नांमध्ये तो अपयशी ठरला. Also Read - Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये Sumit Antil ची 'सुवर्ण' कामगिरी; जागतिक विक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे 'गोल्ड'

Also Read - Tokyo Paralympics 2020: भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं पदक घेतलं काढून; भारताच्या पदकांची संख्या 7 वरून 6 वर

विनोद कुमारने जिंकले कांस्य पदक

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय डिस्कस थ्रोअर विनोद कुमारने (Vinod Kumar) आज कांस्यपदकाची कामाई केली आहे. विनोद कुमारने डिस्कस थ्रो एफ-52 फायनलमध्ये (Discus Throw F52 final) 19.91 मीटरसह कांस्यपदक जिंकले. विनोद कुमारने आपल्या सहा प्रयत्नांमध्ये 17.46, 18.32, 17.80, 19.12, 19.91 आणि 19.81 मीटर डिस्कस फेकले. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी टेबल टेनिस आणि उंच उडीमध्ये देशाच्या खाथ्यात दोन रौप्य पदके पडली आहेत. विनोद कुमार यांनी 19.91 मीटर सर्वोत्तम थ्रोसह आशियाई विक्रम मोडत तिसरे स्थान पटकावले. त्यांनी पोलंडच्या पिओटर कोसेविच (20.02 मीटर) सुवर्ण पदक आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर (19.98 मीटर) रौप्य पदक याच्या मागे राहिले.

विनोद कुमार यांची पार्श्वभूमी

विनोद कुमार हे सीमा सुरक्षा दलाचे (BSf) माजी जवान आहेत. त्यांचे वडील 1971 च्या भारत-पाक युद्धात लढले होते. त्यानंतर विनोद देखील सीमा सुरक्षा दलात (BSf) सामील झाले. प्रशिक्षण घेत असताना ते लेहमधील एका टेकडीवरून खाली पडले. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे ते जवळजवळ एक दशक अंथरुणावर झोपून होते. या दरम्यान त्याची आई आणि वडील दोघांचे निधन झाले.