Top Recommended Stories

U19 World Cup 2022 Final: इतिहास रचला! इंग्लंडचा पराभव करत भारताने पाचव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं

U19 World Cup 2022 Final: कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले.

Published: February 6, 2022 8:17 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

u19 world cup 2022 final, u19 world cup 2022 india vs england, india win world cup, india win world cup u19 world cup, Yash Dhull world cup winning captain, Yash Dhull India u19 World cup winnng captain
This is India's record fifth Under-19 World Cup title in tournament's history after previously winning it in 2000, 2008, 2012, 2018. (@BCCI)

U19 WC 2022 FINAL: अंडर- 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये (U19 WC Semifinal) भारतीय संघाने (Team India) दमदार कामिगिरी केली आहे. इंग्लंडचा (Team England) 4 विकेट्सने दारुन पराभव करत भारतीय संघाने (U19 WC Final) विश्वचषक जिंकला. पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर भारतीय संघाने आपलं नाव कोरलं आहे. या विजयाचा शिल्पकार राज बावा (Raj Bava) ठरला आहे. त्याने या सामान्यामध्ये पाच विकेट्स आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. तर निशांत सिंधूने (Nishant Sindhu) नाबाद 50 धावा करुन भारताचा विजय निश्चित करुन दिला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे जगभरातून कौतुक होत आहे.

Also Read:

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हाच निर्णय त्यांना खूप भारी पडला. भारताच्या रवी कुमार (Ravi Kumar) आणि राज बावा (Raj Bava) यांनी केलेल्या जबरदस्त खेळीमुळे इंग्लंडच्या संघाला 189 धावांमध्ये आपला खेळ संपवावा लागला. या सामन्यामध्ये राज बावाने 5 विकेट्स घेत इंग्लंडचा डाव उधळवून टाकला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले. मात्र उपकर्णधार शेख रशीद (Shaikh Rashid) आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने हा विजय मिळवला. कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

You may like to read

कर्णधार यश धुल हा दिल्लीकर असून त्याच्याकडून पुन्हा एकदा सर्वांनी विजेतेपदाची अपेक्षा केली होती. अखेर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावरच केला. यापूर्वी दिल्लीकर असलेल्या विराट कोहली आणि उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला आहे. दरम्यान, भारतीय संघाने यापूर्वी 2000मध्ये मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) नेतृत्वाखाली पहिल्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2008मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली, 2012मध्ये उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) नेतृत्वाखाली आणि 2018मध्ये पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 8:17 AM IST