Top Recommended Stories

U19 World Cupच्या फायनलमध्ये भारताची धडक, ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी केला पराभव!

U19 World Cup Semifinal: अंडर- 19 विश्वचषक या स्पर्धेचा फायनल शनिवारी होणार असून भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे.

Updated: February 3, 2022 8:25 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

ICC Under 19 World Cup 2022
ICC Under 19 World Cup 2022

U19 World Cup Semifinal: अंडर- 19 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये (U19 WC Semifinal) भारतीय संघाने (Team India) दमदार कामिगिरी केली आहे. बलाढ्य ऑस्ट्रलियाचा (Team Australia) दारुन पराभव करत भारतीय संघाने फायनलमध्ये (U19 WC Final) धडक मारली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर (Coolidge Cricket Ground) रंगलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करत विजय मिळवला. भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आतापर्यंत आठव्यांदा धडक मारली आहे. या स्पर्धेचा फायनल शनिवारी होणार असून भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) असा सामना रंगणार आहे.

Also Read:

शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून (India Win Toss) प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कॅप्टन यश धुल (Captain Yash Dhul) आणि शेख रशीद (Rashid Shaikh) यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 291 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात यश धुलने शतक पूर्ण केले पण रशीद शेख शतक पूर्ण करु शकला नाही. त्याला 94 धावांवरच समाधान मानावे लागले. या सामान्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला (Team Australia) भारतीय संघाने दिलेले आव्हान पेलवले नाही. भारतीय संघाने 194 धावांवरच ऑस्ट्रेलियाच्या संघाचा डाव गुंडाळला.

You may like to read

भारताच्या या दमदार विजयाचा कॅप्टन यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला आहे. त्याने कॅप्टन पदासाठी साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावले. तर शेख रशिदनं 94 धावांची खेळी करून यश धुलला छान साथ दिली. अंडर- 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ धडक मारणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय प्राप्त केला. भारतीय संघाच्या या कामगिरीचे क्रिकेटप्रेमींकडून (Cricket Lovers) कौतुक केले जात आहे. आता 5 फेब्रुवारीला भारत आणि इंग्लंड (India Vs England Final Match) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 3, 2022 8:24 AM IST

Updated Date: February 3, 2022 8:25 AM IST