Under 19 WC: टीम इंडियावर कोरोनाचे सावट, कॅप्टनसह 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!
Under 19 WC: बुधवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हे सहा खेळाडू खेळले नाहीत. या सामन्यामध्ये आता निशांत सिद्धू टीम इंडियाचा कॅप्टन आहे.

Under 19 WC : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये (Under 19 World Cup) सहभागी झालेल्या टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या टीम इंडियावर कोरोनाचे (Corona Virus) सावट आहे. टीम इंडियामध्ये कोरोनाने (Covid-19) शिरकाव केला असून 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत. कॅप्टन यश धुलसह (yash Dhul) सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये (Quarantine) ठेवण्यात आले आहे.
Also Read:
India captain Yash Dhull, five other players test positive for COVID-19 at ICC Under-19 cricket World Cup in West Indies: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2022
बुधवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हे सहा खेळाडू खेळले नाहीत. या सामन्यामध्ये आता निशांत सिद्धू (Nishant Sidhu) टीम इंडियाचा कॅप्टन आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, कॅप्टन यश धुल (Captain Yash Dhul), व्हाइस कॅप्टन एसके राशीद (Vice Captain SK Rashid) यांच्यासह सहा खेळाडू कोरोना पॉझिटव्ह आढळले आहेत. यश धुल, एसके राशीद यांच्या व्यतिरिक्त मानव प्रकाश (Manav Prakash), सिद्धार्थ यादव (Sidharth Yadav), आराध्या यादव (Aradhya Yadav) आणि वासू वत्स (Vasu Vats) यांना कोरोना झाला आहे. हे सर्व खेळाडू क्वारंटाइनमध्ये आहेत. खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे टीम इंडियाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आयसीसीने अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंचा संघात समावेश करण्याची परवानगी दिली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले. या कारणास्तव, खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील मोठ्या सामन्यापूर्वी संघाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. पहिल्या सामन्यात या संघाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. भारताने चार वेळा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला आहे. यावेळी कोरोनाचे संकट असताना टीम इंडिया नेमकी कशी कामगिरी करतेय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या