Top Recommended Stories

Vamikas First Photo: 1 वर्षानंतर पाहायला मिळाली वामिकाची पहिली झलक, नेटकरी म्हणाले...

Vamikas First Photo: वन-डे सामन्यात भारताच्या पराभवापेक्षा सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिकाची.

Updated: January 24, 2022 7:05 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Vamikas First Photo: 1 वर्षानंतर पाहायला मिळाली वामिकाची पहिली झलक, नेटकरी म्हणाले...

Vamikas First Photo : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Actress Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली (Cricketer Virat Kohli) सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. सर्वांचे हे आवडते कपल असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती सुद्धा मिळते. अनुष्का आणि विराटची मुलगी वामिकाला (Vamika) पाहण्यासाठी दोघांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागली होती. पण वामिका एक वर्षांची होऊन सुद्धा कोणला तिचा चेहरा पाहयाल मिळाला नव्हता. अखेर वामिकाचा चेहरा सर्वांना पाहायला मिळाला. या सोशल मीडियावर (Social Media) वामिकाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे. अनुष्कासोबतचा वामिकाचा फोटो (Vamika Photo Viral) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

Also Read:

You may like to read

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवापेक्षा सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिकाची. ही मॅच पाहण्यासाठी अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासोत (Anushka Sharma Daughter Vamika) स्टँडवर उभी राहिली होती. मॅच पाहण्यासाठी आईसोबत उपस्थित असलेल्या वामिकाची पहिली झलक सर्वांना पहायला मिळाले. गेल्या वर्षभरापासून कॅमेऱ्याच्या नजरेतून वाचलेल्या वामिकाचा चेहरा अखेर सर्वांना पाहायला मिळाला. वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वामिकाच्या क्युटनेसने सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अनुष्का शर्मा वामिकाला कडेवर घेऊन मॅच पाहत आहे. अनुष्काने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे तर वामिकाने पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. वामिकाच्या जन्मानंतर म्हणजेचल तब्बल एका वर्षानंतर तिचा फोटो समोर आला आहे. तिचा क्यूटनेस पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अखेर वामिका कशी दिसते हे सर्वांना पाहायला मिळाले. वामिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. ‘हा तर छोटा विराट’, ‘बाप तशी लेक’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 1:11 PM IST

Updated Date: January 24, 2022 7:05 PM IST