Top Recommended Stories

BCCI Thanked Virat : कोहलीसारखा क्रिकेटपटू एका पिढीत एकदाच येतो; BCCI ने मानले विराटचे आभार

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने त्याचे आभार मानले आहेत. रविवारी बीसीसीआयने अधिकृत निवेदन जारी करून विराटचे आभार माणले आणि पुढील कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

Published: January 16, 2022 1:59 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BCCI Thanked Virat : कोहलीसारखा क्रिकेटपटू एका पिढीत एकदाच येतो; BCCI ने मानले विराटचे आभार
Virat Kohli Resigned Test Captaincy A cricketer like Kohli comes only once in a generation; BCCI thanked Virat

Virat Kohli Resigned Test Captaincy : विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) त्याचे आभार मानले आहेत. रविवारी बीसीसीआयने अधिकृत निवेदन जारी करून विराटचे आभार माणले आणि पुढील कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा (BCCI thanked Virat) दिल्या. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिव जय शाह (Jay Shah), उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी भारतीय क्रिकेट संघातील योगदानाबद्दल कोहलीचे आभार मानले.

Also Read:

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला “भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटने दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी वैयक्तिकरित्या त्याचे आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये वेगाने प्रगती केली आहे. त्यांचा हा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा खूप आदर करते. तो या संघाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य म्हणून कायम राहील आणि एका नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात बॅटने आपले योगदान देत राहील आणि या संघाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतो आणि हा खूप चांगला झाला.”

You may like to read

बीसीसीआय सचिव शाह म्हणाले “विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाखालील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. एक लिडर म्हणून त्याचा विक्रम आणि संघासाठीचे योगदान कोणापेक्षाही कमी नाही. भारताला 40 कसोटी विजय मिळवून देणे हे त्याने सर्वस्विपणे केलेल्या नेतृत्वाचा पुरावा आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यासह भारत आणि परदेशात काही उत्कृष्ट कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले. त्याने केलेले प्रयत्नांतून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असलेल्या सहकारी आणि आगामी क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल. आम्ही विराटला त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तो भारतीय संघासाठी मैदानावर अविस्मरणीय योगदान देत राहील.”

बीसीसीआयचे उपाध्यक्ष शुक्ला म्हणाले “विराटसारखा क्रिकेटपटू एका पिढीतून एकदा येतो आणि भारतीय क्रिकेट भाग्यशाली आहे की तो एक लिडर म्हणून संघाची सेवा करतो. त्यांने जोमाने आणि आक्रमकतेने संघाचे नेतृत्व केले आणि देश-विदेशात भारताच्या अनेक संस्मरणीय विजयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो.”

कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ म्हणाले “कधीही हार न मानण्याच्या वृत्तीसह विराटने एक लिडर म्हणून आपले सर्वस्व दिले आहे आणि कर्णधार म्हणून त्याचा उत्कृष्ट विक्रम याची साक्ष आहे. ज्या क्षणापासून तो भारताचा कसोटी कर्णधार झाला, तेव्हापासून त्याने हे सुनिश्चित केले की भारत नेहमीच उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहील आणि जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवेल. फलंदाज म्हणून विराट एक पॉवरहाऊस बनून राहिला, तर दुरीकडे कर्णधार म्हणून त्याने कोणतीही कसर सोडली नाही आणि संघाला जगभरात उत्कृष्ट कामगिरी करण्यात मदत केली. मी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. ”

बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज म्हणाले “विराट हा क्रिकेटच्या इतिहासातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून स्मरणात राहील. त्याने खेळाचा गौरव वाढवला आहे. त्यांने धैर्याने, दृढनिश्चयाने संघाचे नेतृत्व केले आणि एक क्रिकेट टीम म्हणून भारताचे भविष्य घडवण्यात मोठी भूमिका बजावली. आम्हाला खात्री आहे की विराट एक खेळाडू म्हणून आणि संघातील सर्वात अनुभवी सदस्य म्हणून मोठी भूमिका बजावत राहील.”

या स्टार फलंदाज भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. याची घोषणा त्याने ट्विटद्वारे केली. 2015 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या जागी कोहलीला कसोटी कर्णधारपद देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 68 पैकी 40 सामने जिंकले. त्याने संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यास मदत केली आणि संघाला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही गाठली. कोहलीच्या योगदानाबद्दल बीसीसीआयने ट्विटरवर त्याचे आभार मानले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.