Virat Kohli Resigned Test Captaincy : विराट कोहलीने सोडलं कसोटी कर्णधारपद, बीसीसीआयला लिहिला भावनिक संदेश

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिरावून घेतल्यानंतर विराट कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आहे. कोहली यापुढे कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने हा निर्णय घेतला आहे.

Updated: January 15, 2022 8:14 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Virat Kohli Resigned Test Captaincy : विराट कोहलीने सोडलं कसोटी कर्णधारपद, बीसीसीआयला लिहिला भावनिक संदेश
Virat Kohli steps down as India Test captain after t 20i and odi cricket

Virat Kohli steps down as India Test captain : एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिरावून घेतल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटीचे कर्णधारपदही (Test Captaincy ) सोडले आहे. कोहली यापुढे कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने त्याच्या ट्विटरवर हँडलवरून कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत एक पोस्ट (emotional message) शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने बीसीसीआय (BCCI), टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. (Virat Kohli steps down as India Test captain after t 20i and odi cricket)

Also Read:

विराट कोहलीने (Virat Kohli) 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताची (Indian Cricket Team) धुरा सांभाळली. यामध्ये त्याने 40 सामने जिंकून दिले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर 11 कसोटी मालिका खेळल्या. या सर्व मालिका त्याने आपल्या नावावर केल्या. कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (Test Captaincy Resigned) जाहीर करताना कोहलीने बीसीसीआयला भावूक संदेश लिहिला आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम केले, असे त्याने या पत्रात म्हटले आहे.

विराट कोहलीने एक भावनिक संदेश लिहिला

विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर लिहिलेल्या संदेशात (emotional message) लिहिले की, “प्रत्येक गोष्टीला एका टप्प्यावर थांबावे लागते आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून ते आता माझ्यासाठी आहे. मी जे काही करतो त्यात नेहमीच 120 टक्के देण्यावर विश्वास ठेवतो आणि जर मी ते करू शकत नसेल तर मला माहित आहे की ते योग्य नाही. माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे आणि मी माझ्या संघाला फसवू शकत नाही.”

कसोटी फॉर्मेटमध्ये 7 द्विशतके

विराट कोहलीने 99 कसोटी सामन्यांच्या 168 डावात 7962 धावा केल्या आहेत. या दरम्यान 10 वेळा तो नाबाद राहिला. या फऑर्मॅटमध्ये त्याने 27 शतके, 28 अर्धशतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत. त्याची कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254* होती. जर आपण 254 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोललो तर विराटने 39 वेळा नाबाद राहून 12169 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने 43 शतके आणि 62 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीने 95 सामन्यांमध्ये 29 अर्धशतकांच्या मदतीने 3227 धावा केल्या आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 7:51 PM IST

Updated Date: January 15, 2022 8:14 PM IST