मुंबई: आयपीएलच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ सोमवारी एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून  (KKR) पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला. या पराभवासह आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधारपदाचा काळही संपुष्टात आला आहे. विराटने या हंगामाचा दुसरा भाग सुरू होण्यापूर्वीच आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आपल्या कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.Also Read - MS Dhoni पुढील हंगामात CSK सोडणार का? वाचा कॅप्टन कूलने काय दिले उत्तर

आयपीएलमध्ये विराटची (VIRAT KOHLI) कर्णधारपदाची कारकीर्द नक्कीच संपुष्टात आली आहे. परंतु तो या फ्रँचायझीसोबत या लीगमध्ये खेळत राहील असे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच विराटला त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत निश्चितच एक खंत असेल की सलग 9 वर्षे कर्णधार असूनही तो या संघाला एकदाही आयपीएल चॅम्पियन बनवू शकला नाही. Also Read - DC vs KKR Head to Head : आकडे सांगतात कोलकाता दिल्लीसमोर वरचड; जाणून घ्या दोन्ही संघांची समोरासमोर कामगिरी

विराट कोहलीचा आरसीबीचा (RCB) कर्णधार म्हणून रेकॉर्ड

मॅच 140
विजयी 66
पराभव 70
अनिर्णत 4
विजयाची टक्केवारी 48.52

दरम्यान, विराट कोहलीकडे RCB ने 2013 पासून नियमित कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, असे असेल तरी त्यापूर्वी 2011 मध्ये देखील त्याने या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. या फ्रँचायझीचे नेतृत्व न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीकडे (Daniel Vettori) होते. परंतु त्याच्या दुखापतीनंतर संघाचे कर्णधारपद कोहलीकडे (VIRAT KOHLI) सोपवण्यात आले होते. Also Read - IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीचं स्वप्न भंगलं! रोमांचक लढतीत कोलकाताचा दणदणीत विजय

असा होता विराट कोहलीचा आरसीबीचा कर्णधार म्हणून प्रवास

वर्ष स्थान
2013 5 वे स्थान
2014  7 वे स्थान
2015 3 रे स्थान
2016 फायनलमध्ये पराभूत
2017 8 वे स्थान
2018 6 वे स्थान
2019 8 वे स्थान
2020 चौथे स्थान
2021 चौथे स्थान

विराटला आरसीबी संघाचे नियमित कर्णधारपद मिळाले तेव्हापासून म्हणजेच 2013 पासून त्याने फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विराट फलंदाजीतही अधिक चमकदार दिसू लागला आणि एकामागून एक अनेक धडाकेबाज खेळी खेळत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिले.

IPL मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

क्रम नाव मॅच रन सरासरी स्ट्राइक रेट 50/100
1 विराट कोहली 140 4481 42.07 133.32 35/5
2 MS धोनी 203 4456 40.88 137.32 22/0
3 गौतम गंभीर 129 3518 30.13 122.79 31/0
4 रोहित शर्मा 129 3406 30.14 129.95 23/0
5 डेविड वॉर्नर 69 2840 47.33 142.28 26/1

आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराटने एकूण 5 शतके आपल्या नावावर केली. या लीगमध्ये तो एकमेव कर्णधार आहे ज्याने सर्वाधिक 5 शतके केली आहेत. या लीगमधील खेळाडू म्हणून तो ख्रिस गेल (6 शतके) नंतर सर्वाधिक शतके करणारा दुसरा खेळाडू आहे.