साऊथम्पटन : द रोझ बाऊल येथे भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (world test championship final 2021) अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात पावसामुळं अनेकदा व्यत्यय आला. पहिल्या डावात 217 धावा केल्यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसर्‍या डावात भारताने दोन बाद 64 धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाने 32 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर गुंडाळला गेला आणि त्यांना 32 धावांची मिळाही होती. भारताकडून सध्या मैदानावर चेतेश्वर पुजारा (12) आणि कर्णधार विराट कोहली (8) खेळत आहेत. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने आतापर्यंत दोन गडी बाद केले आहेत.Also Read - IND vs SL, 1st Test: Virat Kohli बनला 100 कसोटी सामने खेळणारा 12वा भारतीय फलंदाज, या दिग्गजांच्या यादीत स्थान

या सामन्यात विराट कोहलीने (virat kohli) आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. कोहली आयसीसी स्पर्धेतील (icc tournament) उपांत्य आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे टाकले आहे. या सामन्यात कोहलीने आतापर्यंत 535 धावा केल्या आहेत. यापूर्वी कुमार संगकाराच्या नावावर सर्वाधिक 531 धावांचा विक्रम होता. (virat kohli surpasses kumar sangakkara record of most runs in icc tournament semi final and final) Also Read - ICC Announced T20 World Cup schedule: टी-20 विश्वचषकाचे आयसीसीने वेळापत्रक केले जाहीर; असे खेळले जाणार सामने

आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली – 535 धावा
  • कुमार संगकारा – 531 धावा
  • रिकी पाँटिंग – 509 धावा

या सामन्यात मैदानावर उतरताच विराट कोहलीनेही माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही विक्रम मोडला आहे. कर्णधार म्हणून कोहलीचा हा 61 वा कसोटी सामना आहे. तर माहीने 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व केले आहे. तसंच विराट कोहलीने सलग नऊ कसोटी मालिकादेखील जिंकल्या आहेत. Also Read - IND vs SA 3rd Test : DRS वादानंतर ICC ने उचललं महत्त्वाचं पाऊल, टीम इंडियाला दिला इशारा

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता आणि एकही चेंडू न खेळता चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळं रद्द करण्यात आला होता. मंगळवारी देखील पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. पहिल्या दिवसाच्या खेळातही पावसामुळं व्यत्यय आला होता, त्यामुळं बुधवार म्हणजेच 23 जून हा या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. त्याचा आता उपयोग करण्यात येत आहे.