मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) न्यूझीलंडच्या टीमने (New Zealand Team) चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडने टीम इंडियाचा (Team India) 8 धावांनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसीचे (ICC) जेतेपद मिळवण्यात यश आले नाही. विराट कोहलीच्या (Viral Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडिया दोन्ही डावांमध्ये फक्त 217 आणि 170 धावा करु शकली. टीम इंडियाच्या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (indian team coach ravi shastri) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.Also Read - Virat Kohli Corona Positive: टीम इंडियाची चिंता वाढली! विराट कोहलीला कोरोनाची लागण

Also Read - Anushka Sharma ने मालदीवच्या बीचवर मुलगी वामिकासोबत चालवली सायकल, व्हिडिओ होतोय व्हायरल!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर रवी शास्त्री नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी ट्वीट (Tweet) करत यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘परिस्थिती पाहता सर्वोत्तम टीम जिंकली. वर्ल्ड चॅम्पियन (World Champion) होण्यासाठी न्यूझीलंडने खूप वेळ वाट पाहिली. मोठं यश सहजासहजी मिळत नाही. हे त्याचं एक उदाहरण आहे. खूप चांगले खेळले. न्यूझीलंडसाठी सन्मान.’ Also Read - Virushka Net Worth: दिल्लीत 80 कोटींचे घर, मुंबईत 34 कोटींचा फ्लॅट; अशी रॉयल लाईफस्टाईल जगतात विरुष्का!

टीम इंडियाच्या पराभवाला कॅप्टन विराट कोहलीला (Captan Virat Kohli) जबाबदार धरले जात आहे. पराभवानंतर विराट कोहलीने देखील प्रतिक्रिया दिली. त्याने असे सांगितले की, ‘पावसामुळे आम्हाला लय मिळणं मुश्किल झालं होतं, त्यात बॅट्समनकडून म्हणावी तशी कामगिरी झाली नाही.’ दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियन होण्यापूर्वी न्यूझीलंडने 2000 मध्ये आयसीसीचं एकमेव विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी किवी टीमने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव केला होता. न्यूझीलंडला 2015 आणि 2019च्या वर्ल्ड कपच्या (World Cup) अंतिम सामन्यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.