मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC World Test Championship) भारताच्या पराभवाचं समीक्षण केलं आहे. मास्टर ब्लास्टर म्हणाला की, टीम इंडियानं या सामन्यात चुकीच्या बॉलिंग कॉम्बिनेशनची निवड केली. त्यामुळं संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सचिन म्हणाला की याशिवाय दुसर्‍या डावात रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी कमी संधी देणं देखील भारताला महागात पडलं.Also Read - Sachin Tendulkar Shered Pic : सचिन तेंडुलकरने शेअर केला मुलगी सारासोबतचा 'हा' फोटो, सौरव गांगुली आणि सुरेश रैनानेही केले कौतुक

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेल्या सचिनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की सामन्याच्या पहिल्या काही दिवसात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळं फिरकीपटू खेळात येऊ शकले नाहीत. विशेषत: डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा, ज्याने पहिल्या डावात फक्त 7.2 षटके टाकली होती. मात्र, जडेजाने सहाव्या दिवशी दुसऱ्या डावात सुर्यप्रकार व्यवस्थित असताना 8 षटके टाकली. Also Read - आहाsss! सचिन तेंडुलकरच्या कन्येचा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिला का? फोटो पाहून म्हणाल पोरगी लाखात एक..

पुढे बोलताना सचिन म्हणाला, ‘तुम्ही पाच गोलंदाजांसह खेळत असाल, तर सर्व पाच गोलंदाजांना समान षटके मिळणे अशक्य आहे. तुम्हाला खेळपट्टीची स्थिती, ओव्हरहेडची स्थिती, हवेतून मिळणारी मदत हे लक्षा घेणे आवश्यक आहे. त्यानुसारच तुम्ही निर्णय घेऊ शकता. सचिन म्हणाला, पहिल्या डावात रविंद्रन अश्विनला जाडेजाच्या (7.2-2-20-1) तुलनेत जास्त षटके (15-5-28-2) गोलंदाजी देण्यामागचा तर्क लक्षात येतो, कारण न्यूझीलंडच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाद्वारे फुटमार्क बनले होते. गोलंदाज आणि विरोधी संघाकडे डावखुरे फलंदाज होते. मात्र, दुसर्‍या डावात त्याने जडेजाला दुर्दैवी म्हटले. Also Read - सचिन तेंडुलकर-विनोद कांबळींचे उदाहरण देत कपील देव यांनी युवा खेळाडूंना सांगितला सक्सेस मंत्र

100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणार्‍या एकमेव खेळाडू असलेल्या सचिनने सांगितले की, साऊथॅम्प्टनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे, फिरकी गोलंदाजांसाठी नाही. तेंडुलकर म्हणाला, गोलंदाजांना समान संधी मिळाली नाही त्यामागचे कारण हे होते की, वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. फिरकीपटूंसाठी खेळपट्टी असते, वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी असते. तुम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागेल.

भारत दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह खेळला, तर न्यूझीलंडने चारही बाजूंनी वेगवान आक्रमण केले. सीम-गोलंदाजी करणारा अष्टपैलू कॉलिन डी ग्रॅन्डहोमने पाचव्या गोलंदाज म्हणून काम केले. यामुळंच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 8 विकेटने गमावला.