मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील माजी ऑलराउंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) साऊथ आफ्रिकेत 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) आठवणींना उजाळा मिळवून दिला आहे. युवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनातली खदखद तब्बल 14 वर्षांनंतर बोलून दाखवली आहे. T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व अर्थात कर्णधारपद MS धोनीकडे नाही तर माझ्याकडे सोपवलं जाईल, अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही, असं स्टायलिश लेफ्टहँडर फलंदाज युवराज सिंह यानं सांगितलं आहे. Also Read - IPL 2021 पूर्वी कॅप्टन कूल MS Dhoni च्या फिटनेसची झलक; घोड्यासोबत लावली रेस, पाहा व्हिडिओ

युवराज सिंह यानं भारतीय संघाला 2011 चा वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कर्णधार होण्याची अपेक्षा होती, पण महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) नाव कॅप्टन म्हणून निवड समितीनं जाहीर केलं होतं, असं युवराजनं सांगितलं. Also Read - Viral Photo : भारतीय क्रिकेटपटूंचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तुम्हीही सुचवा कॅप्शन

एमएस धोनीकडे (MS Dhoni) संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं. तेव्हा तर त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करून केवळ 3 वर्षे झाली होती. इंटरनेशनल क्रिकेटमध्ये पहिली संधी मिळाली तेव्हा धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यानं भारताला विश्वचषक जिंकून देवून आश्चर्याचा धक्का दिला, असं युवाराजनं गौरव कपूरच्या ‘पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. त्या काळात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड फलंदाजांचा देखील बोल बाला होता. या सर्वांनी टूर्नामेंटमधून आपापली नावं मागे घेतली होती. अशा परिस्थितीत भारतानं मैदानावर युवा टीम उतरली होती. Also Read - भारतात नाही UAE मध्ये होणार T20 World Cup 2021! PCB अध्यक्षांचा दावा

युवराज सिंह म्हणाला, मला संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही, म्हणून काय झालं, मी एक टीम मॅन म्हणून मैदानात उतरलो. युवराज सिंहनं या टूर्नामेंटमध्ये 6 सामने खेळला. त्यानं 148 धावांचं योगदान दिलं. सोबतच एक विकेट घेतलं होतं. भारताचा त्यावर्षी झालेल्या 50 षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये या देशांचा दोन महिन्यांचा दौरा होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप होणार होता. त्यावेळी टीममधील सीनियर्सनी ब्रेक घेण्याचे ठरवले होते. कुणीही टी 20 वर्ल्ड कप गांभीर्याने घेतला नव्हता. मला, मात्र त्यावेळी कॅप्टन होईल, अशी अपेक्षा होती. पण धोनीच्या नावाच्या नावाची घोषणा झाली.

MS धोनी कर्णधार झाला म्हणून त्याचे आणि आपले संबंधांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं युवराजनं सांगितलं. टीमचा कॅप्टन राहुल द्रविड, सौरव गांगुली किंवा इतर कोणीही असला असता तरी आपण एक क्रिकेटपटू म्हणून शंभर टक्के योगदान देणं हे माझं कर्तव्य होतं, असं युवराजनं यावेळी स्पष्ट केलं.