नवी दिल्ली : सोशल मीडियाचं लोण वाढल्यापासून ई-मेल स्कॅम काही नवे नाहीयेत. याद्वारे अनेकदा यूजर्सना खोट्या ई-मेल्सच्या माध्यमातून फसवलं जातं. स्कॅमर्स यूजर्सना वेगवेगळे फ्रॉड ई-मेल पाठवतात आणि त्यातून यूजर्सची माहिती चोरी केली जाते. हे ई-मेल्स असे बनवले जातात की, त्यावर यूजर्स क्लिक करतातच. अशा ई-मेल्सची खास ट्रिक म्हणजे जिज्ञासा आणि ऑफर्स असते. आता स्कॅमर्सने यूजर्सना गंडवण्यासाठी एक नवीन कल्पना आणली आहे.

स्कॅमर्स आता एक असं डिझाईन केलं आहे जे फेसबुकने ई-मेल केल्यासारखं दिसतं. या असं सांगितलं जातं की, तुम्ही फेसबुक मेसेज ब-याच काळापासून पाहिलेले नाहीयेत. त्यामुळे ते सर्व मेसेज डिलिट केले जाईल.

स्कॅमर्स पाठवताहेत असे मेल :
ई-मेल स्कॅमचं नवं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, हा मेल फेसबुकचं नोटिफिकेशन आहे. मेलच्या सब्जेक्टमध्ये लिहिण्यात आलंय की, ‘तुमचे मेसेज लवकरच डिलिट केले जातील’. मेलच्या बॉडीमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘तुम्ही अनेक दिवसांपासून फेसबुकचा वापर केला नाहीये आणि त्यादरम्यान फेसबुकवर खूप काही घडलं आहे’. याच्या खाली दोन लिंक देण्यात आल्या आहेत. एक लिंक view the message आणि दुसरी लिंक go to Facebook ची आहे. यासोबतच मेसेजमध्ये देण्यात आलेलं फुटर फेसबुक मेल्सच्या फुटर सारखंच देण्यात आलंय.

क्लिक केल्यावर काय होणार ?
यात देण्यात आलेल्या view the message आणि go to Facebook या लिंक्सवर क्लिक केल्यावर यूजर्स शॉपिंग वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जातील. इथे तुमच्या प्रत्येक क्लिकवर स्कॅमर्सला पैसे मिळतील. तुम्ही जितके क्लिक कराल किंवा तेथून कोणत्याही वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हाल तितके जास्त पैसे स्कॅमर्सला मिळतील.