नवी दिल्ली : जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि रिचार्ज करण्याचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक मिळवता येऊ शकतं. फ्लिपकार्टचं मोबाईल वॉलेट PhonePe वर जिओच्या प्रीपेड रिचार्जवर ७६ रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.

सध्या ग्राहक समर सरप्राईज आणि धन धना धन ऑफर सर्वात जास्त वापरत आहेत. धन धना धन ऑफरमध्ये यूजर्सना ३९९ रूपयात ८४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा वापरता येत आहे.

कशी घेणार ही कॅशबॅक ऑफर ?

– जिओ ग्राहकांसाठी ही ऑफर १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. यात ७५ रूपयांचं कॅशबॅक मिळणार आहे.
– ग्राहकांना कमीत कमी ३०० रूपयांचं रिचार्ज करावं लागेल.
– ही ऑफर जिओ प्रीपेड ग्राहकांसाठी केवळ पहिल्या रिचार्जसाठी लागू आहे.
– ही ऑफर iOS आणि Android या दोन्ही डिव्हाईससाठी आहे.