Viral Video: तलावातील बोटीवर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होतोय व्हायरल!

विकेंड इन्जॉय करण्यासाठी आलेला एक पर्यटक व्हिडिओग्राफी करत असताना ही दुर्घटना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

Updated: January 9, 2022 10:56 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

canyon cliff collapses on boats
canyon cliff collapses on boats

Viral Video : ब्राझीलमधील (Brazil) एका तलावात शनिवारी खडकाचा काही भाग म्हणजेच दरड कोसळली. ही दरड त्यावेळी तलावामध्ये उपस्थित असलेल्या बोटींवर कोसळली. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी अनेक पर्यटक तलावातील बोटींमध्ये विकेंडचा आनंद लुटत होते. याच दरम्यान दरड कोसळून (Landslide) ही दुर्घटना घडली. विकेंड इन्जॉय करण्यासाठी आलेला एक पर्यटक व्हिडिओग्राफी (Videography) करत असताना ही दुर्घटना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

Also Read:

मिनास गेराइस राज्य अग्निशमन विभागाचे कमांडर एडगार्ड एस्टेव्हो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 20 जण बेपत्ता असल्याची भीती आहे. तर या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले आहेत त्यापैकी अनेकांना शनिवारी संध्याकाळी उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.’ या अपघाताचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की त्यावेळी नेमकं काय घडले असावे. फर्नेस लेकवर (Lake Furnas) बोट राईडचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी झालेली असते. अनेक जण बोटीतून राईडचा आनंद घेत असतात. त्याचवेळी मोठी दुर्घटना घडते.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, खडकाचे काही तुकडे तलावामध्ये पडतात. हे पाहून तलावाच्या ठिकाणी उपस्थित असलेले काही जण बोटीवरील लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळातच खडकाचा मोठा भाग तलावामध्ये कोसळतो. खडकाचे तुकडे तीन बोटींवर (canyon cliff collapses on boats) पडून मोठी दुर्घटना घडते. या घटनेनंतर त्याठिकाणी एकच खळबळ उडते. तात्काळ बचाव कार्य सुरु करत दुर्घटनेत जखमी झालेल्यांना वाचवण्यात आले. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 10:56 AM IST

Updated Date: January 9, 2022 10:56 AM IST