मुंबई : नवरात्रीनिमित्त (Navratri 2021) सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. देशभरातील भाविक नवरात्रोत्सवात (Navratri) मग्न आहेत. देशाच्या बहुतांश भागामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची मूर्ती (Durga devi) बसवली जाते आणि 9 दिवस मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी खूप चांगला संदेश दिला जात आहे. अनेक हिंदू सणांमध्ये (Hindu Festival) मुस्लिम समाजातील (Muslim community) काही तरुण मोठ्या उत्साहात सहभाग घेत असल्याचे आपण पाहिले आहे. यावर्षी आसाममध्ये अनोखे चित्र पाहायाला मिळाले आहे. ते म्हणजे नवरात्रोत्सवामध्ये दुर्गा देवीच्या पंडालमध्ये दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना मुस्लिम समाजातील तरुण फळांचे वाटप करत आहेत.Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अलर्ट जारी, गैर काश्मीरी मजुरांना सुरक्षा छावणीत हलवण्याच्या सूचना

Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

आसाममध्ये नवरात्रोत्सव (Assam Navratri) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आसामच्या सिलचर आणि काचरमध्ये ठिकठिकाणी दुर्गा पूजा पंडाल (Durga Puja) सजवण्यात आले आहेत. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. याच दरम्यान याठिकाणच्या मुस्लिम समाजातील तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हे तरुण दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फळे वाटप करत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. Also Read - Breaking News Live Updates: डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर, AIIMS प्रशासनाने दिली माहिती

फळांचे वाटप करणाऱ्या तरुणांमधील राजा लष्कर या तरुणाने सांगितले की, ‘आम्हाला एकतेचा संदेश द्यायचा आहे. ( Hindu-Muslim unit is intact) आपण सर्वजण एकच आहोत. चुकीच्या शक्ती आपल्याला वेगळे करु शकत नाहीत. (divisive forces won’t succeed) आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही.’ त्याचसोबत मुस्लिम तरुणाचा हा उपक्रम सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. ऐवढेच नाही तर त्यांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) देखील नेटिझन्स या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.