मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे विडिओ व्हायरल होत असतात. दररोज हजारो लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. यातील काही थोड्या वेळातच प्रचंड व्हायरल होतात. सध्या एसी चोरीचा (AC Chor Video) एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकता की भरदिवसा दुचाकीवरुन जाणारे दोन चोर एका शोरूमजवळ थांबतात. यामधील एक व्यक्ती दुचाकीवरून उतरते आणि तिथे उभे राहून आजूबाजूची परिस्थिती पाहते. जेव्हा रस्ता मोकळा असल्याची खात्री चोराला होते तेव्हा तो लगेच शोरूमजवळ येतो आणि बाहेर ठेवलेला एसी उचलून बाईकवर बसून घेऊन जातो.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की चोराने एसीचा संपूर्ण बॉक्सच उचलला आणि लगेच दुचाकीवर बसला. यानंतर त्याच्या साथीदाराने बाईक सुरू केली आणि दोघेही वाऱ्याच्या वेगाने पळून गेले. त्याच वेळी शोरूममध्ये बसलेल्या मालकाला ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांने लगेच चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली. पण तोपर्यंत ते दोघेही खूप दूर गेले होते.

येथे पहा व्हिडिओ…

सोशल मीडिया यूजर्स देखील चोरीच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की “सावध राहा, सतर्क रहा, हेवी चोरासोबत हेवी ड्रायव्हरने आपली टीम बनवली आहे”. दुसऱ्या एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले “अनुभव असलेला चोर निघाला”. तर आणखी एका वापरकर्त्याने मजेशीर कमेंट करत लिहिले “एसी चाले कूल-कूल आणि हा माणूस एकदम ब्यूटीफूल”.