मुंबई: तुम्ही कधी पक्ष्यांना स्वतःसारखे दोन्ही हातांनी अन्न खाताना पाहिले आहे का? नक्कीच याचं उत्तर नाही असणार. पण तुम्हाला पक्षी कधी हाताने जेवताना, हाताने पाणी पिताना, सेल्फी घेताना, लॅपटॉपवर काम करताना दिसले तर तुम्ही काय म्हणाल? थोडं वेगळं वाटतंय ना? मात्र असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अनोखा व्हिडीओत पक्षांना हात असते तर ते काय काय करू शकले असते हे अगदी मनोरंजक पद्धतीने मांडले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.Also Read - Parineeti Chopra चा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल, मोनोकनीमधील व्हिडीओला चाहत्यांची पसंती

पक्षी आपले काम दोन्ही हातांनी करतात किंवा पाऊस टाळण्यासाठी छत्रीचा वापर करतात असे तुम्ही पाहिले आहे का? मात्र असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही खळखळून हसाल असा आमचा दावा आहे. हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पक्ष्यांकडे पाहण्याची विचारसरणी देखील बदलू शकते. Also Read - Viral Video: कौतुकास्पद! भिंत कोसळताना पाहून आईने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचे असे वाचवले प्राण!

Also Read - कोणाचं काय तर कोणाचं काय! नागपुरात कोंबड्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

हा व्हिडीओ इतका अप्रतिम आहे की जो कोणी एकदा पाहतो त्याची पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते. सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. व्हिडिओ खरा नसून तो एडिट केलेला आहे. परंतु आपल्याला या व्हिडिओमधील सर्जनशीलता पाहण्याची आवश्यकता आहे. या व्हिडिओची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पाहिल्यानंतर आपण एका वेगळ्याच जगात असल्याचा आपल्याला भास होतो.

ट्विटरवर हा व्हिडिओ @DograTishaa नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने “जर पक्ष्यांना हात असते तर” असे कॅप्शन दिले आहे. यावर एका युजरने लिहिले आहे “जर पक्षांनी हा व्हिडिओ पाहिला, तर त्यांनाही वाटेल की हे होऊ शकते” अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले आहेत