Top Recommended Stories

Bride Groom Video: नवरदेवाचे सगळ्यांदेखत केलेले कृत्य पाहिल्यानंतर पाहुणे मंडळी झाली आवाक्, Video होतोय व्हायरल

Bride Groom Video: प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक केव्हा काही करतील हे सांगता येत नाही. अलिकडे सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ शेअर करण्याची प्रमाण खूप वाढले आहे. नवरदेव आणि नवरीचं विचारूच नका.

Published: February 8, 2022 6:54 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Bride Groom Video: नवरदेवाचे सगळ्यांदेखत केलेले कृत्य पाहिल्यानंतर पाहुणे मंडळी झाली आवाक्, Video होतोय व्हायरल

Bride Groom Video: प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक केव्हा काही करतील हे सांगता येत नाही. अलिकडे सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ शेअर करण्याची प्रमाण खूप वाढले आहे. नवरदेव आणि नवरीचं विचारूच नका. ते एकसे बढकर एक क्रिएटिव्ह व्हिडिओ (Creative Video) पोस्ट करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी तर एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) तुफान व्हायरल झाला होता. त्यात नवरीने चक्क नवरदेवाच्या गळ्यातच मंगळसूत्र घातले होते. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. नवरदेवाने सगळ्यांदेखीत नवरीसोबत असे कृत्य केले की ते पाहून पाहुणे मंडळी आवाक् झाली.

Also Read:

नवरदेवाने नेमके काय केले?

तुम्ही नेहमी बघितले असेल की लग्नात वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालतात. नंतर नवरी, नवरदेवाच्या पाया पडते, आशीर्वाद घेते. मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उलट यात चक्क नवरदेवाने नवरीच्या पाया पडल्या. झाला ना चकीत! खरं तर नवी पिढी समाजात नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. नव्या ट्रेंडच्या ( new Trend) नावाखाली परंपरा, रिती-रिवाज मागे पडत आहे.

You may like to read

तुम्हीच पाहा व्हिडिओ…

View this post on Instagram

A post shared by WedAbout.com (@wedabout)

पाहुण्यांसमोर पडल्या पाया…

नवरीच्या पाया पाडणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाने पाहुण्यांसमोर नवरीच्या पाया पडल्या. इतकेच नाही तर सगळ्या पाहुण्यांसमोर नवरीच्या गालाचा मुका घेतला. त्यानंतर नवरदेवाने गुडघ्यावर बसून नवरीला प्रपोज देखील केले.नंतर नवरदेव-नवरीने एकमेकांना अंगठी घालत आलिंगन देखील दिले. लग्न समारंभात सध्या हा ट्रेंड धूम करीत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 6:54 PM IST