लंडन : ब्रिटनचे 42 वर्षीय आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) आपली सहकारी जीना कोलादानगेलोचं (Gina Coladangelo) चुंबन घेताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयातील हॅनकॉक यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) हॅनकॉक आपल्या ऑफिसच्या बाहेर जिनाचं चुंबन (Kiss) घेताना दिसले आहे. हा व्हिडिओ गेल्या महिन्याच्या 6 तारखेचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री आणि त्यांची सहकारी दोघांनीही सध्या मौन बाळगलं आहे. ‘द सन’ने या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.Also Read - Viral Video : ...अन् बघता बघता दुचाकीस्वार पत्नीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाला, सुदैवाने वाचला जीव!

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ब्रिटनमध्यील राजकारणात भूकंप झाला आहे. या दरम्यान हॅनकॉक यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणारी जीना कोलादानगेलो अज्ञातवासात निघून गेली आहे. हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी जिना कोलादानगेलो आपल्या कारमधून कुठेतरी जाताना दिसली होती. मात्र ती कुठे गेली आणि कधी येणार हे अद्याप समजू शकलेले नाही. Also Read - Viral Video: वरळी सी लिंकवर अपघाताचा थरार, टॅक्सीच्या धडकेत दोघांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांचे कार्यालयातीलच सहकारी महलेशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान हॅनकॉक यांनी एका निवेदनात जनतेची माफी मागितली आहे, मात्र ही माफी केवळ सामाजिक अंतर न पाळल्यामुळं मागितली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास देखील नकार दिला आहे. Also Read - Pune News : धक्कादायक! पुण्यामध्ये दिवसाढवळ्या सराफावर चाकू हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

हॅनकॉक यांनी आपल्या निवेदनात अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या नाहीत. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबासाठी गोपनीयतेचे आवाहन केले आहे. हॅनकॉक यांच्या समर्थनार्थ समोर आललेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले की, की ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आणि मंत्रीपदाशी त्याचा काहीही संबंध नाही. (Britain’s health minister Matt Hancock captured on CCTV camera kissing his colleague Gina Coladangelo)

दुसरीकडे, राजीनामा हॅनकॉक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांचे म्हणणे आहे की, आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी विशेष संबंध ठेवणे ही करदात्यांची फसवणूक आहे. एवढेच नाही तर सामाजिक अंतराचे नियम मोडणे हा जनतेचा विश्वासघात असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. हा वाद वाढल्यानंतर हॅनकॉक यांनी एका लसीकरण केंद्राची भेटही रद्द केली. त्यामुळे त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला. (Britain’s health minister Matt Hancock captured on CCTV camera kissing his colleague Gina Coladangelo)