मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामधील प्रत्येक व्हिडिओची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. आजकाल प्राण्यांचे व्हिडिओ (Animal Video) खूपच व्हायरल होतात. यामध्ये प्राण्याच्या इमानदारी, त्यांचे प्रेम, त्यांची मारामारी यासारखे बरेच व्हिडिओ समोर येत असतात. या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळते. सध्या एका म्हैशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी ही म्हैस तीन सिंहाना भारी पडली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका म्हैशीला तीन सिंह घेराव घालून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण ही म्हैस स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आपल्या हुशारीने या तिन्ही सिंहांना प्रत्युत्तर देते. बराच वेळा ती या सिंहांना पळवून लावण्याचा प्रयत्न करते अखेर म्हशींचा कळप येतो आणि ते तिन्ही सिंहांना पळवून लावतात. Also Read - Viral Video : धक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

Also Read - Karishma Kapoor Birthday : नवऱ्यापासून वेगळी होऊनही करिश्मा कपूर आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण!

हा व्हिडिओ ‘Life and nature’ या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट (Tweeter Post) करण्यात आला आहे. या व्हिडिओला 4 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. या व्हिडिओला लाईक करत नेटिझन्सनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर (Tweeter Account) हा व्हिडिओ शेअर केला आहे.

याआधी सोशल मीडियावर हत्ती, कुत्रे, मांजर, माकड यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले आहे. असं म्हणतात प्राण्याला एकदा जीव लावला की ते शेवटपर्यंत आपली साथ देतात. तुम्ही त्या प्राण्यांवर जेवढं प्रेम करता तेवढंच ते तुमच्यावर देखील करतात. प्राणी देखील आपल्याप्रमाणे भावनिक असतात. काही दिवसांपूर्वी एका हत्तीचा व्हिडिओ समोर आला होता. हा हत्ती आपल्या मालकाच्या अंतदर्शनासाठी आला होता. त्याआधी एका मांजराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही मांजर एका लहान मुलाला गॅलरीतून खाली डोकवण्यापासून रोखत होती. या व्हिडिओला खूप लाइक्स मिळाले होते.