Top Recommended Stories

Car Accident Video: देव तारी त्याला कोण मारी! भीषण अपघात होऊन चालकाला खरचटले सुद्धा नाही, व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकित!

Car Accident Video: कारचा भीषण अपघात होतो पण या कारमधील चालकाला साधं खरचटलं सुद्धा नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Published: January 22, 2022 4:47 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Car Accident Video
Car Accident Video

Car Accident Video: ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणेच एक घटना सध्या समोर आली आहे. एका कार अपघाताचा (Car Accident) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या कारचा भीषण अपघात होतो पण या कारमधील चालकाला (Car Driver) साधं खरचटलं सुद्धा नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अपघातामध्ये कारची जी अवस्था झाली आहे ती पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की या कारमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. पण कारच्या चालकाला काहीही दुखापत झालेली नसून तो सुखरुप आहे.

Also Read:

You may like to read

महामार्गावरुन कार चालवत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि कार गार्ड रेलला जाऊन धडकते. हा अपघात इतका भीषण आहे की ही कार गार्ड रेलमध्ये जवळपास पन्नास फूटापर्यंत घुसते. कारच्या आरपार हा गार्ड रेल घुसतो. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातामध्ये कारच्या चालकाला काहीच दुखापत होत नाही एकदम सुखरुप आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अपघातानंतर कार चालक रस्त्याच्या कडेला बसलेला आहे. या अपघातग्रस्त कारला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ पाहत असताना सर्वात आधी कार दिसते त्यानंतर कारच्या मागे रस्त्याच्या कडेला बसलेला चालक दिसतो. हा व्हिडिओ बघता सर्वांना कारची अवस्था पाहून धक्का बसतो पण चालकाचे काय झाले असावे असा विचार करत असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या चालकाला पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. हा चमत्कारच म्हणावा लागेल की ऐवढ्या भीषण अपघातात हा चालक वाचला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्व जण आश्चर्यचकीत होत आहे. कारच्या भीषण अपघाताचा हा व्हिडिओ punjabi_industry नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) शेअर करण्यात आला आहे. काही क्षणातच या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 22, 2022 4:47 PM IST