Crorepati Kabutar: काय सांगता... कोट्याधीश आहेत येथील कबूतर, नावावर आहे शेकडो एकर जमीन आणि बरंच काही!

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील जसनगर गावात अनेक कबूतर कोट्याधीश आहेत. त्यांच्या नावांवर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे.

Published: January 10, 2022 3:26 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Crorepati Kabutar: काय सांगता... कोट्याधीश आहेत येथील कबूतर, नावावर आहे शेकडो एकर जमीन आणि बरंच काही!

Crorepati Kabutar: तुम्ही आतापर्यंत अनेक कोट्याधीश आसामी बघितले असतील. परंतु कधी कोट्याधीश प्राणी किंवा पक्षी पाहिला आहे का? तुम्ही म्हणाल हो, ‘आम्ही चित्रपटात हे पाहिले आहे. पण ते मनोरंजन असतं.’ जसे की बॉलिवूडमधील चित्रपट ‘एंटरटेनमेंट’मध्ये एक  मालक त्याची कोट्यावधींची मालमत्ता त्याच्या डॉगीच्या नावावर करतो. परंतु आम्ही आज आपल्याला अशी काही माहिती घेऊन आलो आहे, की ते ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. कोट्याधीश कबूतरांबाबत (Pigeon)आम्ही आपल्याला सांगत आहोत.

Also Read:

कोट्याधीश कबूतर, हे ऐकून तुम्हाला थोडं खटकले देखील असेल. पण हे सत्य आहे. Zee Rajasthan च्या रिपोर्टनुसार, राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील जसनगर गावात अनेक कबूतर कोट्याधीश आहेत. त्यांच्या नावांवर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यात दुकाने, शेतजमिनी आणि रोख रक्कम देखील आहे.

जसनगर येथील कबूतरांच्या नावावर एकून 27 दुकानी आहेत, 126 बिघा जमीन आणि बँक खात्यावर जवळपास 30 लाख रुपये जमा आहे. एवढेच नाही तर कबूतरांच्या 10 बीघा जमिनीवर 470 गायींची एक गोशाळा सुरू आहे.

काय आहे नेमके हे प्रकरण?

40 वर्षांपूर्वी जसनगर गावाचे माजी सरपंच रामदीन चोटिया यांच्या निर्देशानुसार त्यांचे गुरु मरुधर केसरी यांची प्रेरणा घेऊन गावात आलेले उद्योगपती स्वर्गीय सज्जनराज जैन व प्रभुसिंह राजपुरोहित द्वारा कबूतरान ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. असे सांगितले जाते की, गावातील दानशुरांनी कबुतरांच्या संरक्षणासाठी आणि नियमित धान्य पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून नगरमध्ये 27 दुकाने बांधली आणि ती त्यांच्या नावे देखील केली. आता ट्रस्टच्या उत्पन्नातून गेल्या 30 वर्षांपासून दररोज 3 पोती धान्य मिळते.

कबूतरान ट्रस्टतर्फे दररोज 3 पोते धान्याची व्यवस्था केली जाते. ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या गोशाळेत 470 गायींसाठी आवश्यक असल्यास चारा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. दुकानांमधून भाड्याच्या रूपात एकूण मासिक उत्पन्न सुमारे 80 हजार मिळते. सुमारे 126 बिघे शेतजमिनीची स्थावर मालमत्ता आहे. या उत्पनातून बचत झालेली रक्कम कबुतरांच्या बँकेत जमा केली जाते. आज ही रक्कम 30 लाखांच्या जवळपास आहे.

जसनगर गावासह आजुबाजुच्या शहरातील अनेक दानशुरांनी कबुतरांच्या संरक्षणासाठी खुलेआम देणगी दिली होती. ते आजही दान करत आहेत. त्या देणगीच्या पैशाचा योग्य वापर व्हावा व कबुतरांच्या दाना-पाण्याची कधीही अडचण होऊ नये, यासाठी ग्रामस्थ व ट्रस्टच्या लोकांनी मिळून दुकाने केली. आज या दुकानांमधून सुमारे 9 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते, जे कबुतरांना पाणी देण्यासाठी खर्च केले जाते, अशी माहिती ट्रस्टचे सचिव प्रभुसिंह राजपुरोहित यांनी दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 3:26 PM IST