काही लोक रस्त्यावर प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतात. त्यावेळी त्यांच्या हातून छोटीशी चूक होते आणि त्यांच्या ते लक्षात देखील येत नाही. या चुकीचा मात्र त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेला चक्क उंदरासोबत मस्ती करणं चांगलंच महागात पडलं. महिला उंदरासोबत खेळत असतो. मात्र, भर रस्त्यावर छोटासा उंदीर तिची अशी काही फजिती करेल, याबाबत तिनं विचार देखील केला नसेल.Also Read - Wedding Video: नवरीला KISS करताच नवऱ्या मुलानं हरपली शुद्ध, जमिनीवर कोसळला...

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत दिसतं की, रस्त्याच्या बाजुला एक महिला उभी आहे. तिला एक छोटासा उंदीर दिसतो. ती त्याच्यासोबत मस्ती करते. त्याला जवळ बोलवते. उंदीरही तिच्याजवळ जातो. पाहता पाहता तो अचानक उडी मारून तिच्या ड्रेसमध्ये घुसतो. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरते. स्कर्ट सांभाळते तितक्यात उंदीर खाली पडतो अन् तिचा जीव भांड्यात पडतो. Also Read - Snake Dance Video: सापाला डान्स करताना कधी पाहिलंय का?, नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ नक्की पाहा!

View this post on Instagram

A post shared by FailArmy (@failarmy)


failarmy नामक यूजरनं हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘वन्य प्राण्यांची अशी थट्टा करू नका…’, असं कॅप्शन व्हिडिओखाली दिलं आहे. सध्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीड लाख लोकांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे. लोक त्यावर मजेदार कमेंट देखील करत आहे. Also Read - Prasad Lad Apologized: शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी, म्हणाले - 'माझ्या विधानाचा विपर्यास...'