
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Viral Video : कोरोना महामारीमुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव सण (Ganeshostav 2022) शांततेमध्ये साजरा करण्यात आला होता. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे सरकारने (Maharashtra Government) सर्व निर्बंध उठवत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. आज घरोघरी गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन झाले आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. अशामध्ये सोशल मीडियावर (Social Media) एका गणपती बाप्पाच्या मूर्तीचा व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. हा बाप्पा भक्ताला थेट उभं राहून आशीर्वाद देतो.
साताऱ्यातील एका मूर्तीकाराने ही गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. हा बाप्पा भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू यासाठी ठरत आहे कारण हा बाप्पा भक्ताला उभं राहून आशीर्वाद देतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गणपती बाप्पाची बसलेली मूर्ती आहे. पण भक्त जेव्हा बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पायाला स्पर्श करतो त्यावेळी बाप्पा थेट उभं राहून आपल्या भक्ताला दर्शन देतो. त्यानंतर बाप्पा पुन्हा आहे त्या बसलेल्या स्थितीत जात असल्याचे दिसत आहे. हा बाप्पा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या बाप्पाच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हा बाप्पा भक्ताला उभं राहून देतो आशीर्वाद. सातारा जिल्ह्यातील मूर्तीकाराने साकारली मूर्ती. या बाप्पाच्या पायाला स्पर्श केले असता बाप्पा उभं राहून देतो दर्शन…#GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 #GaneshFestival2022 #GanpatiBappaMorya pic.twitter.com/qRGsLhm6DD
— India.com Marathi (@marathiindiacom) August 31, 2022
दरम्यान, राज्यामध्ये यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा होणार आहे. सरकारने परवानगी दिल्यामुळे ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला आणण्यात येत आहे. मनमोकळेपणाने गणेशभक्तांना यावर्षी बाप्पाची सेवा करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद आहे. महत्वाचे म्हणजे मोठमोठे गणेशोत्सव मंडळांनी देखील आकर्षक बाप्पाची मुर्ती आणि सजावट केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी सकाळपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या