मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एका महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची बातमी (10 children birth news) खूपच व्हायरल (Viral News) होत आहे. ही घटना दक्षिण अफ्रिकेमधील (South Africa) आहे. एकाचवेळी महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. पण आता या घटनेमागचे सत्य समोर आले आहे. तपासानंतर ही घटना खोटी असल्याची माहिती मिळाली आहे. 10 मुलांना जन्म देणाऱ्या या महिलेची कहाणी खोटी असून ती गर्भवती नव्हती असे दक्षिण अफ्रिकेच्या सरकारने (South Africa Government) स्पष्ट केले आहे.Also Read - Viral Video : 70 वर्षांच्या आजीचा जबरदस्त स्टंट, पुलावरुन थेट गंगा नदीत मारली उडी!

दक्षिण अफ्रिकेत राहणारी गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची बातमी समोर आल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले. या महिलेने 7 मुलं आणि 3 मुलींना एकाच वेळी जन्म दिला होता. या घटनेची नोंद गिनीज बुकने (Guinness Book) देखील घेतल्याचे सांगण्यात आले होते. पण आता ही घटना खोटी (fake news) असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वांना पुन्हा धक्का बसला आहे. गौतेंग प्रांतीय सरकारने एक निवेदन जारी करत सांगितले की, ’10 मुलांना जन्म देण्याचा दावा करणारी दक्षिण अफ्रिकेची ही महिला मागील काही महिन्यांमध्ये गरोदर नव्हती.’ Also Read - Bhagyashree Mote Hot Pics: मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्रीनं ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा... पाहा फोटो

Also Read - Devendra Fadnavis Tweet Viral: 'मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...' उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर व्हायरल होतेय देवेंद्र फडणवीसांचं जुनं ट्वीट

स्थानिक वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, ’37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल या महिलेने दावा केला होता की 7 जून रोजी तिने गौतेंग प्रांतातील एका स्थानिक रुग्णालयात (Local Hospital) 10 मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर गौतेंग प्रांतीय सरकारने सत्यता स्थापित करण्यासाठी या प्रांतातील सर्व रुग्णालयांची सखोल चौकशी (inquiry) केली. तर धक्कादायक माहिती समोर आली. प्रांतातील कोणत्याही सरकारी आणि खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या जन्माची नोंद नाही.’

त्यानंतर, गोसियामी धमारा सिटहोलला 18 जून रोजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तर डॉक्टरांनी सांगितले की, अलीकडच्या काळात गोसियामीने कोणत्याही मुलाला जन्म दिला नाही. तसंच ती अलिकडच्या काळात गरोदर नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलेचा खोटारडेपणा समोर आला.