Sapna Chaoudharyचे जबरदस्त ठुमके पाहून आजोबाही लागले नाचायला, व्हिडिओ होतोय व्हायरल!

या व्हिडिओला आतापर्यंत 27 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Published: January 8, 2022 4:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Whose name tattoo did Sapna Choudhary get inked in latest beautiful pics is it veer
Sapna Choudhary

Sapna Choudhary Dance Video: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी ( Actress Sapna Chaoudhary) तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. देशभरात तिच्या डान्सचे (Sapna Choudhary Dance) अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सपनाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Sapna Choudhary Dance video) पोस्ट होताच तो लगेच व्हायरल होतो. सपना चौधरीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिची डान्स स्टाईल सर्वांना प्रचंड आवडते. आता सपना चौधरीचा एक थ्रोबॅक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओचे खास वैशिष्ट्य म्हणजे सपना चौधरीला स्टेजवर नाचताना पाहून खाली प्रेक्षकांमध्ये उभे असलेले आजोबा डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Also Read:

हरियाणवी छोरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सपना चौधरीची क्रेझ लहान मुलं, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत पाहायला मिळत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सपना हरियाणवी गाण्यावर डान्स करत आहे. सपना चौधरी गाण्यावर जबरदस्त ठुमके देताना दिसत आहे. स्टेजवर सपनाला डान्स करताना पाहून खाली उभे असलेले काही लोक आणि आजोबा देखील नाचू लागतात. या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की या व्हिडिओला आतापर्यंत 27 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्रिमूर्ती कॅसेट्स यूट्यूब चॅनलवर (Youtube Channel) हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

सपना चौधरीच्या या डान्स व्हिडिओमधील आजोबांच्या डान्सला सुद्धा खूप जास्त पसंती मिळत आहे. या व्हिडिओ लोकं भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सपना चौधरीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या म्युझिक व्हिडिओमध्ये (Music Video) खूप सक्रिय आहे. नुकतीच तिची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. यापूर्वी तिने बॉलीवूड (Bollywood), भोजपुरी (Bhojpuri), पंजाबी (Punjabi) आणि हरियाणवी (hariyanavi) चित्रपटांमध्येही चमक दाखवली आहे. सपनाने बिग बॉसमध्येही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 4:11 PM IST