Top Recommended Stories

Gym Viral Video: जिममध्ये हेवी वेट उचलणे पडले महागात, महिलेचा जागीच झाला मृत्यू!

Gym Viral Video: कोणताही आधार न घेता जिममध्ये हेवी वेट उचलणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक धडा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ मेक्सिकोमधील आहे.

Updated: February 25, 2022 7:29 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Viral Video
Viral Video

Gym Viral Video : आपलं शरीर चागलं असावं, निरोगी रहावं यासाठी अनेक जण जिमला (Gym) जाऊन व्यायाम करतात. पण जिममध्ये जाऊन व्यायाम करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. जिममध्ये हेवी वेट उचलताना योग्य प्रकारे काळजी घ्यावी नाही तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हेवी वेट (Heavy weight) उचलण्याच्या नादात महिलेला आपला जीव गमवावा लागला.

You may like to read

कोणताही आधार न घेता जिममध्ये हेवी वेट उचलणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ (Gym Video) एक धडा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ मेक्सिकोमधील (Mexico) आहे. याठिकाणी राहणारी एक महिला जीममध्ये वर्कआऊट (Gym Workout) करण्यासाठी गेली होती. या महिलेने उत्साहाच्या भरामध्ये जिममध्ये असलेले हेवी वेट उचलण्यास सुरुवात केली. ही महिला हेवी वेट उचलण्याचा प्रयत्न करताना तिचा मृत्यू होतो. 180 किलो वजनाच्या बारबेलखाली दबल्यामुळे या महिलेचा मृत्यू होतो. जिममध्ये उपस्थित असलेले सर्वजण तिच्या मदतीसाठी धावून येतात. पण ते हेवी वेट बाजूला करतात तर ही महिला जमिनीवर कोसळते. तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सोशल मीडियावर या महिलाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो.

रिपोर्ट्सनुसार, महिला तिच्या मुलीसोबत जिममध्ये आली होती. अतिरिक्त वजन सहन न झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. हे दृश्य कोणालाही अस्वस्थ करू शकते. जिमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून कोणीही जिममध्ये व्यायाम करताना विशेषत: हेवी वेट उचलताना काळजी घेणे गरजेचे आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.