मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Bollywood Actor Salman Khan) सुपरहिट चित्रपट ‘बजरंगी भाईजान’मध्ये (Bajrangi Bhaijaan) झळकलेली ‘मुन्नी’ आता मोठी झाली आहे. हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) हिने ‘बजरंगी भाईजान’मध्ये ‘मुन्नी’ नामक मूक-बधीर मुलीची भूमिका साकारली होती. हर्षाली मल्होत्राची शानदार भूमिका पाहून एका रात्रीतून तिचे लाखो प्रशंसक बनले होते. हर्षालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.Also Read - Viral Video: शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितलं टॅलेंट दाखवा, विद्यार्थ्यांनी जे काही केले ते पाहून तुम्ही सुद्धा पोट धरुन हसाल!

हर्षाली ही सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह आहे. तिनं इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती डान्स करताना दिसते आहे. हर्षालीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायर होत आहे. आतापर्यंत लाखो चाहत्यांनी व्हिडीओ पाहिला आहे. Also Read - Bday Girl Entry Video: वाढदिवसाच्या पार्टीत मुलीची टॅक्टरवरुन जबरदस्त एन्ट्री, आनंद महिंद्रांनी सुद्धा शेअर केला व्हिडिओ!

Also Read - Viral Video: पाण्याऐवजी पाईपमधून निघू लागल्या नोटा, लाखो रुपये पाहून सर्वजण चकरावले!

हर्षाली हिनं मंगळवार, अर्थात 26 ऑक्टोबरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलिवूड एक्टर अक्षय कुमारचा चित्रपट ‘सुहाग’मधील साँग ‘गोरे-गोरे मुखडे’वर हर्षालीनं धम्माल डान्स केला आबे. सुरुवातीला व्हिडीओ साधारण वाटतो. परंतु नंतर हर्षालीच्या एकापेक्षा एक शानदार स्टेप्स पाहून तो जबरदस्त होतो आणि व्हिडीओ वारंवार पाहावासा वाटतो आहे.

व्हिडीओवर नेटिजन्स कमेंटही करत आहेत. भारताबाहेर राहतो, परंतु हर्षालीचे व्हिडीओ पाहायला विसरत नसल्याचं एका यूजरने म्हटलं आहे. तर वाह! क्या बात है, असंही दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे.