Top Recommended Stories

Italian Man Eat Samosa: इटालियन गर्लफ्रेंडच्या वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी भरतीय बॉयफ्रेंडची भन्नाट शक्कल! पाहा व्हिडिओ

Italian Man Eat Samosa : तुम्ही सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ भन्नाट कल्पणांनी भरलेले असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ पाहायला व्हायरल होतोय.

Published: January 26, 2022 5:55 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Italian Man Eat Samosa: इटालियन गर्लफ्रेंडच्या वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी भरतीय बॉयफ्रेंडची भन्नाट शक्कल! पाहा व्हिडिओ
Italian Man Eat Samosa

Italian Man Eat Samosa : तुम्ही सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ (Funny video) पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ भन्नाट कल्पणांनी (Bhannat Kalpana) भरलेले असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ पाहायला व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडिओत एक भारतीय तरुणाने आपल्या इटालियन मैत्रिणीच्या वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी शक्कल लढविल्याचे तुम्ही पाहू शकता.

Also Read:

या व्हिडिओतील भारतीय तरुण आपल्या इटालियन गर्लफ्रेंडच्या (Italian Girlfriend) वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांना समोसा खाऊ घालतो. समोसा खाल्ल्यानंतर गर्लफ्रेंडच्या वडिलांचे (Girlfriend’s father) हावभाव बघण्यासारखे आहे. हा व्हिडीओ बघून तुमचा दिवस आनंदात जाईल हे नक्की. व्हिडिओतील गर्लफ्रेंडच्या वडिलांनी पहिल्यांदाच समोसा (Samosa) खाल्ल्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन्स अप्रतिम आहेत. भारतीय खाद्यपदार्थांना तोड नाही अशी भावना व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येक भारतीच्या मनात येईल. या इटालियन व्यक्तीचा पहिल्यांदाच समोसा खातानाचा व्हिडिओ (Italian Man Eat Samosa) इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

You may like to read

हा व्हिडिओ indian_italian-couple नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला सर्वात आधी अमित-अंबरा नावाच्या भारतीय- इटालियन कपलने सर्वात आधी पोस्ट केले आहे. अमित आणि अम्ब्रा नावाच्या इंडो-इटालियन जोडप्याने हा व्हिडिओ सर्वप्रथम पोस्ट केला होता. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती अम्ब्राचे वडील आहेत जे पहिल्यांदाच भारतीय जेवणचा आस्वाद घेत होते. अम्ब्रा मूळची इटलीची असून ती भारतीय तरुण अमितसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अंब्राच्या वडिलांना प्रभावित करण्यासाठी अमितने त्यांना समोसे खाऊ घातले.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की अम्ब्राचे वडील समोसा खाण्याआधी समोस्यावर थोडी हिरवी चटणी टाकतात. त्यानंतर ते समोस्याचा घास घेतात आणि आनंदाने नाचू लागतात. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत लाखों लोकांनी पाहिला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 5:55 PM IST