Top Recommended Stories

Jammu and Kashmir Video: बुरखा घालून आलेल्या महिलेने CRPF बंकरवर फेकला पेट्रोल बॉम्ब, पाहा व्हिडिओ

Jammu and Kashmir Video: जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागातील सीआरपीएफ बंकरमध्ये बुरख्यातील महिलेने बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

Published: March 30, 2022 1:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Jammu and Kashmir Video: बुरखा घालून आलेल्या महिलेने CRPF बंकरवर फेकला पेट्रोल बॉम्ब, पाहा व्हिडिओ
female terrorists throws petrol bomb at CRPF bunker In Jammu Kashmir

Jammu and Kashmir Video: जम्मू-काश्मीरच्या सोपोर (Sopore, Jammu and Kashmir) भागातील सीआरपीएफ बंकरमध्ये बुरख्यातील महिलेने बॉम्ब फेकल्याची (woman throws petrol bomb at CRPF bunker) घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल (Viral video) होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की बुरखा घालून आलेल्या माहिलेने सोबत आणलेल्या पिशवीतून बॉम्ब काढला आणि लायटरने पेटवून तो सीआरपीएफच्या बंकरवर (CRPF bunker) फेकला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Also Read:

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सोपोर (Sopore) भागातील सीआरपीएफ बंकरसमोर बुरखा घातलेली एक महिला येते आणि तिच्या हातातील पॅकेट उघडते आणि त्यातून एक बॉम्ब काढते आणि लायटरने जाळून बंकरवर फेकते ( female terrorists throws petrol bomb) आणि पळून जाते. महिलेने बंकरवर पेट्रोल बॉम्ब (Petrol bomb) फेकल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये या घटनेनंतर सीआरपीएफचे जवान बंकरमधील आग विझवताना दिसत आहेत.जम्मू-काश्मीर परिसरातही दहशतवादी कारवायांमध्ये महिलांची सक्रियता वाढत आहे. या घटनेची माहिती देताना काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सोपोरमधील सीआरपीएफ बंकरवर बॉम्ब फेकणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. तिला लवकरच अटक करण्यात येईल. (Female terrorists throws petrol bomb at CRPF bunker In Jammu Kashmir, watch video)

You may like to read

खोऱ्यात महिला दहशतवाद्यांच्या हालचालींमध्ये वाढ

महिला दहशतवादी संघटना दुखतरन-ए-मिल्लत जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. ही संघटना काश्मीरमध्ये इस्लामिक कायदा प्रस्थापित करण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी जिहादचे समर्थन करते. माहितीनुसार या संघटनेची स्थापना 1987 मध्ये झाली आणि तिची लीडर आसिया अंद्राबी आहे. अंद्राबी आणि तिची सहकारी फहमिदा सोफिसोपोर सध्या तिहार तुरुंगात आहेत. एनआयएने या दोघींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आसिया ही दरवर्षी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावायची आणि सुरक्षा दलांविरोधात आंदोलन करण्यासाठी मुलींना भडकवत आंदोलन करत होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.