Kerala Lottery 2022: 300 रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटानं बदललं पेंटरचं नशिब, जिंकले 12 कोटींचे बक्षीस
घरोघरी जाऊन रंगकाम करणारे केरळ येथील पेंटर सदानंदन यांच्या निशबाने एका झटक्यात त्यांना कोट्यधीश केले आहे. त्यांनी कधीच कल्पणा केली नसेल एवढी मोठी लॉटरी त्यांना लागली आहे.

Kerala Painter Won Lottery of Rs 12 crore : घरोघरी जाऊन रंगकाम करणारे केरळ येथील पेंटर सदानंदन (Painter Sadanandan Won Lottery ) यांच्या निशबाने एका झटक्यात त्यांना कोट्यधीश (crorepati) केले आहे. त्यांनी कधीच कल्पणा केली नसेल एवढी मोठी लॉटरी (big lottery) त्यांना लागली आहे. सदानंद यांनी लॉटरीमधून चक्क 12 कोटींचे बक्षिस जिंकले (Won a prize of Rs 12 crore) आहे. आयमनमजवळील कुदयमपाडी येथे राहणाऱ्या सदानंदन (Sadanandan) यांनी रविवारी सकाळी लॉटरीचे तिकीट (Lottery tickets) खरेदी केले होते. लॉटरीच्या सोडतीच्या काही तास आधी सदानंदन यांनी हे तिकीट खरेदी केले होते.
गेल्या 50 वर्षांपासून पेंटिंगचे काम करणाऱ्या सदानंदन यांनी सांगितले की काल सकाळी जेव्हा ते घरातील वस्तू घेण्यासाठी बाजारात गेले होते तेव्हा त्यांनी लॉटरीचे तिकीटही खरेदी केले होते. सदानंदन गेल्या अनेक वर्षांपासून लॉटरीची (Kerala Lottery) तिकिटे खरेदी करत होते. पण एवढं मोठं बक्षीस निघेल याची कल्पणा त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. अनेकदा छोटे-मोठे बक्षीस निघत होते. मात्र यांवेळी केवळ 300 रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटाने त्यांना करोडपती बनवले आहे.
लॉटरीचे तिकिट मिळ्यानंतर सदानंदन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील संदस्य आनंद साजरा करत आहे. लॉटरी विक्रेत्याने जेव्हा त्यांना सांगितले की तुम्ही 12 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे, तेव्हा माझा विश्वासच बसला नाही, असे सदानंद यांनी सांगितले. या बक्षिसाचे पैसे ते मुलगा सनीश आणि संजय यांचे आयुष्य सुधारण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ख्रिसमस बंपर लॉटरीच्या (Christmas Bumper Lottery ) तिकिटाची किंमत 300 रुपये होती. या लॉटरीचे दुसरे बक्षीस 3 कोटी रुपये आणि तिसरे बक्षीस 60 लाख रुपये होते.
स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार लॉटरी विभागाने सुरुवातीला 24 लाख तिकिटे छापली होती. सर्व तिकिटांची विक्री झाल्यानंतर 9 लाख आणि नंतर 8.34 लाख तिकिट आणखी छापण्यात आले. यापूर्वी केरळमधील एका ऑटो चालकाने सप्टेंबर 2021 मध्ये ओणमनंतर 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या