मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची (Viral video) चर्चा होते. काही व्हिडिओ असे असतात की त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आतापर्यंत आपण महिलांना भरतनाट्यम (Bharatnatyam dance) करताना पाहिले. पण एकादा पुरुष महिलेपेक्षा जबरदस्त भरतनाट्यम डान्स करताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा भरतनाट्यम डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटिझन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे.Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Also Read - Viral Video : धक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

या व्हिडिओला इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटर अकाऊंटवर (Tweeter Account) शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘अशाप्रकारच्या कंटेटसाठी मी ट्विटरवर आपला वेळ घालवतो.’ या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नरतनाट्यम डान्स करताना दिसत आहे. या व्यक्तीने पायामध्ये घुंगरु बांधले आहेत. तब्येतीला जाड असताना सुद्धा ही व्यक्ती अप्रतिम भरतनाट्यम डान्स (Bharatnatyam dance video) करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून त्याला भरनाट्यम डान्सबद्दल चांगली माहिती असावी असे दिसून येते. Also Read - Karishma Kapoor Birthday : नवऱ्यापासून वेगळी होऊनही करिश्मा कपूर आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला नेटिझन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे. या व्हिडिओला 71 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सर्वजण त्या व्यक्तीचे फॅन झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून कोणालाही त्याचे डान्स स्टेप फॉलो करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहत नाही.

दरम्यान, भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्याचा एक प्रसिद्ध प्रकार आहे. भरतनाट्यम हे भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकारांपैकी एक आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याशी संबंधित हा नृत्यप्रकार आहे. ज्यापद्धतीने वेस्टर्न डान्सला महत्व दिले जाते तसंच भारतामध्ये भरतनाट्यमला देखील महत्व दिले जाते. नृत्याची आवड असणाऱ्या तरुणी हा नृत्यप्रकार शिकण्यास प्राधान्य देतात.