जोधपूर : प्राण्यांना जीव लागला तर ते सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ (Viral Video) आपण सोशल मीडियावर (Social Media) पाहिले आहेत. पण एखादं माकड (Monkey) अचानक घरामध्ये शिरल्यावर कोणाचीही घाबरगुंडी उडेल. पण घरात आलेलं माकड आपल्यावर प्रेम करत असेल तर कोणालाही आश्चर्यच वाटल्याशिवाय राहणार नाही. पण राजस्थानमध्ये (Rajasthan) अशी घटना घडली आहे. या माकडाचा व्हिडिओ (Monkey video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने केलेले कृत्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. नेटिझन्सकडून या माकडाचे खूपच कौतुक होत आहे.Also Read - Karishma Kapoor Birthday : नवऱ्यापासून वेगळी होऊनही करिश्मा कपूर आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण!

राजस्थानच्या जोधपूर (Jodhpur) आणि जैसलमेर या दोन शहरांच्यामध्ये असलेल्या फलोदी गावात ही घटना घडली आहे. या गावामध्ये राहणाऱ्या 90 वर्षांच्या भंवरी देवी या आजी बेडवर झोपल्या होत्या. अचानक त्यांच्या खोलीमध्ये माकड येते. बघता बघता हे माकड त्यांच्या बेडवर येऊन थेट त्यांच्या अंगावर बसतो. घरामध्ये असलेले सर्वजण खूप घाबरतात. पण हे माकड आजीला काहीच करत नाही. उलट ते आजीला दोन वेळा मिठी मारतो आणि आजीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात (Monkey love Gramdmother) फिरवून त्याठिकाणावरुन निघून जाते.

Also Read - Viral Video : ट्रेनला लटकून स्टंट करणं पडलं महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर जखमी!

घरातील एका सदस्याने मोबाईलमध्ये (Mobile) हा व्हिडिओ कैद केला आहे. सध्या हा व्हिडओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राधिका सोनी (Radhika Soni) यांनी सांगितले की, ‘आमच्या गावामध्ये माकडं येणं ही सामान्य गोष्ट नाही. जेव्हा आम्ही आमच्या खोलीत माकड पाहिले तेव्हा आम्ही सर्वजण खूप घाबरलो. ते माकड आम्हाला काही नुकसान पोहचवेल आणि त्याला त्याठिकाणावरुन पळवून लावावे असा विचार करताच ते माकड खूप शांतपणे आमच्या आजीजवळ गेले. आजीच्या जवळ जाऊन तो तिचा लाड करु लागतो. हे पाहून असं कसं होऊ शकतं याचं सर्वांना आश्चर्य वाटत होते. पण माकड आजीचा लाड करुन त्याठिकाणावरुन गुपचूप निघून जातो.’ Also Read - Viral Video: वरातीमध्ये नवरदेवाने अतिउत्साहात हवेत केला गोळीबार,  गोळी लागून मित्राचा झाला मृत्यू!