मुंबई : देशामध्ये कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरु आहे. कोरोनाचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लसीकरण (Corona vaccination) मोहिमेवर भर दिला आहे. लस घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ (Photo and Video) अनेक जण आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर पोस्ट करतात. याच दरम्यान लसीकरणाच्या एका धक्कादायक व्हिडिओने (Viral Video) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये एक नर्स तरुणाला कोरोनाप्रतिबंधक लस देताना दिसत आहे. पण ही नर्स इंजेक्शनमध्ये कोरोनाची लस न भरता त्या तरुणाला इंजेक्शन देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स यावर तीव्र संताप व्यक्त करत आहे.Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

हा व्हिडिओ बिहारच्या छपरामधील (Bihar Chapara) आहे. या व्हिडिओमध्ये लसीकरण सुरु असल्याचे दिसत आहे. एक तरुण लस घेण्यासाठी खुर्चीवर बसला आहे. नर्स या तरुणाला कोरोनावरील (Corona vaccine) लस देत आहे. ती नवीन इंजेक्शन घेते पण त्यामध्ये कोरोनाची लस भरत नाही. बोलता बोलता ही नर्स तरुणाला तसंच इंजेक्शन (Injecion) देते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर बिहारच्या आरोग्य विभागाला (Bihar Health Department) ट्रोल (Troll) केले जात आहे. नेटिझन्सनी बिहारच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लस देणारी नर्स चंदा देवीला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे.

दरम्यान, नर्स चंदा देवीने सांगितले की, लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) मोठी गर्दी होती. त्यामुळे ती इंजेक्शनमध्ये लस भरायला विसरली. बिहारच्या आरोग्य विभागाकडून चंदा देवी यांची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पाटणामध्ये घडली होती. त्यावेळी एका तरुणाला एकाच वेळी दोन लस देण्यात आली होती.