Top Recommended Stories

Ola Electric Scooter : कस्टमर सर्व्हिसमुळे त्रस्त ग्राहकाने स्कूटर चक्क गाढवाला बांधून काढली परेड, VIDEO झाला व्हायरल

Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric ) नुकतेच इलेक्ट्रिक स्कूटरचे 2 नवीन मॉडेल ( Ola Scooter new  Model ) लॉन्च केले आहे. हे मॉडेल लॉन्च केल्यानंतर कंपनी सतत वादात सापडली आहे. आधी स्कूटरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याबद्दल वाद झाला होता, जो नंतर खराब गुणवत्ता आणि विक्रीच्या आकड्यांपर्यंत पोहचला. यानंतर कधी ओला स्कुटरला अचानक आग तर कधी इतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या बातम्या येत होत्या.

Published: April 27, 2022 11:21 AM IST

By Vikas Chavhan | Edited by Vikas Chavhan

Ola Electric Scooter : कस्टमर सर्व्हिसमुळे त्रस्त ग्राहकाने स्कूटर चक्क गाढवाला बांधून काढली परेड, VIDEO झाला व्हायरल

Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric ) नुकतेच इलेक्ट्रिक स्कूटरचे (Electric Scooter) 2 नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. हे मॉडेल लॉन्च ( Ola Scooter new  Model) केल्यानंतर कंपनी सतत वादात सापडली आहे. आधी स्कूटरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याबद्दल वाद झाला होता, जो नंतर खराब गुणवत्ता आणि विक्रीच्या आकड्यांपर्यंत पोहचला. यानंतर कधी ओला स्कूटरला अचानक आग तर कधी इतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या बातम्या येत होत्या. अशातच राज्यातील बीड जिल्ह्यातील एका ग्राहकाने ओलाच्या ग्राहक सेवेच्या प्रतिसादामुळे संतप्त होत चक्क ओला स्कूटरला गाढवाला बांधून परेड काढली. या परेडचा व्हिडीओ साध्य सोशल मीडियावर व्हायरल (Ola Scooter Viral Video)  होत आहे.

झालं असं की, बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले सचिन गित्ते यांनी सप्टेंबर 2021 मध्ये ऑल इलेक्ट्रिक स्कूटर बुक केली होती. त्यांना 24 मार्च 2022 रोजी ओला इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली. काही दिवसातच या स्कूटरमध्ये अडचणी निर्माण होऊ लागलया आणि स्कूटर बंद पडली. याबाबत सचिन यांनी ओलाच्या ग्राहका सेवा केंद्राला संपर्क केला. मात्र, सचिन यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त होत सचिन यांनी चक्क ओलची स्कूटर गाढवाला बांधून शहरातून परेड काढली. या सोबत त्यांनी बॅनर लावत ओलावर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील केले आहे.

You may like to read

 या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ स्थानिक न्यूज चॅनेलने इंस्टग्रामवर टाकला असता विडिओ काही वेळातच व्हायरल झाला. सचिन यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच ही ओला स्कूटर खरेदी केली आहे. तांत्रिक अडचण येत ही स्कूटर अचानक बंद पडाली.  याबाबत सचिन यांनी तक्रार केल्यानंतर एकदा ओला कंपनीच्या मॅकेनिकने स्कूटर दुरुस्त केली होती. काही दिवसांनी पुन्हा स्कूटरमध्ये अडचणी येऊ लागल्या आणि स्कुटर बंद पडली. त्यानंतर कंपनीकड़ून कोणीही स्कूटर दुरुस्त करण्यासाठी आला नाही. याबाबत सचिन यांनी अनेकदा कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरला कॉल केला मात्र कांपनीकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली. यामुळे नाराज झलेल्या सचिन गित्ते यांनी अनोख्या पध्द्तीने विरोध नोंदविण्याचा निर्णय घेत चक्क स्कूटर गाढवाला बांधून परेड काढली. यावेळी स्कूटरवर त्यांनी ओलाच्या विरोधात बॅनर देखील लावले.

दरम्यान, या प्रकारणी सचिन गित्ते यांनी ग्रहक मंचाकडे देखील तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, ओला कंपनीतर्फे ग्राहकांना कोणत्याही प्रकरचे आर्थिक संरक्षण मिळतात नाही. तक्रारीनंतर स्कूटर दुरुस्त किंवा रिप्लेस केली जात नाही. या प्रकारणी चौकशी करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.