कुत्रा (Dog) हा प्रामाणिक प्राणी आहे. कुत्र्याचा वापर घराची राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी किंवा गुन्ह्यांच्या तपासणीसाठी केला जातो. बहुतांश लोक घरात कुत्रा (Pet Dog) पाळतात. त्याचे लाड केले जातात. काळजीही घेतली जाते. कुत्र्यालाही आपला लळा लागतो. तो आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. मालकानं आपल्या लाडक्या मृत कुत्र्याच्या पाचव्या स्मृतिदिनाला पितळाचा मूर्ती बनवून तिचा अभिषेक केला. विधिवत पूजा केली.
Also Read - Kisan Vikas Patra : मोदी सरकारकडून व्याजदरात वाढ! आता केवळ 123 महिन्यांमध्ये दुप्पट होईल तुमचा पैसा

आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील अम्पापुरम (Ampapuram in Krishna dist) येथील ही घटना आहे. एका व्यक्तीनं आपल्या पाळीव कुत्र्याचा (pet dog) पाचवा स्मृतिदिन भावपूर्ण वातवरणात साजरा केला. घरासमोर लाडक्या कुत्र्याची पितळाची मूर्ती बनवली. इतकंच नाही तर संपूर्ण कुटुंबासह मूर्तीचा अभिषेक करून विधिवत पूजन केलं.
Also Read - Womens Health tips : गर्भपातानंतर महिलांनी घ्यावा असा आहार, आरोग्य सुधारण्यास होईल मदत!

सुनकारा ज्ञानप्रकाश राव असं या व्यक्तीचं नाव आहे. 9 वर्षे आपल्यासोबत असलेला कुत्रा पाच वर्षांपूर्वी दगावला. त्याच्या आठवणीत सुनकारा राव आपल्या कुत्र्याची पूजा करतात. कुत्र्याच्या पाचव्या स्मृतिदिनी सुनकारा राव यांनी पितळाची मूर्ती बनवली आहे. कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये कुत्र्याच्या स्मृति कायम ताज्या राहाव्या, हा या मागील उद्देश असल्याचं सुनकारा यांनी सांगितलं. Also Read - Mark Zuckerberg : मेटा टीमचे बजेट घसरणार, कर्मचाऱ्यांची होणार कपात; नव्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवाजे बंद!


वृत्तसंस्था ANIशी बोलताना सुनकारा राब यांनी सांगितलं की, आम्ही त्याला आपला मुलगा समजत होते. तो खूप प्रामाणिक होता. कुत्र्याच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील लोक सहभागी झाले होते.