नवी दिल्ली : बॉलिवूड अनेक चित्रपटांमध्ये पोलिसांना भ्रस्ट आणि व्हिलन दाखवण्यात आले आहेत. तर काही असेही चित्रपट आहेत ज्यात पोलिसांना हिरो देखील दाखवण्यात आले आहे. त्यातील सिंघम चित्रपट माहित नाही असे कदाचित कोणी असू शकेल. या चित्रपटातील सिंघमच्या भूमिकेनंतर धडाकेबाज किंवा अनोखी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना देकील सिंघम ही उपमा देण्यात येऊ लागली आहे. अशाच एका सिंघम पोलिसाचा (Policewala Real Singham) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रेरणा मिळू शकते.Also Read - Delta Variant: लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरेल, WHOने दिला इशारा

सिंघमसारखे शूर पोलीस केवळ चित्रपटात असतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पाहून तुमचा विचार बदलणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेला या व्हिडिओ एका पोलीस कर्मचाऱ्याने एका वृद्धाला आपल्या पाठीवरून उचलून नेऊन कोरोनाचे लसीकरण केले आहे. या पोलिसांने केलेल्या या काममुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक (Real Singham) होत आहे. Also Read - Corona Vaccine Price Hike: कोरोना प्रतिबंधक लसींच्या दरात वाढ, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवीन दर घ्या जाणून!

हा व्हिडिओ जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यातला आहे. येथील SPO Mohan Singh यांनी माणुसकीचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. मोहन सिंग यांनी अब्दुल गनी नावाच्या एका वृद्ध व्यक्तिला आपल्या पाठीवर उचलून डोंगराचा रस्ता पार केला आणि 72 वर्ष वय असलेल्या या वृद्धाला लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवले. Also Read - Corona Vaccine: कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांनी कमी: ICMR

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एसपीओ मोहन सिंग यांच्या या कार्याला सलााम केला आहे. जितेंद्र सिंह यांनी लिहिले की, “आमचे फ्रंटलाइन योद्धे एसपीओ मोहनसिंग यांचा आम्हाला गर्व आहे. त्यांनी 72 वर्षांच्या अब्दुल गनी यांना लसीकरण करण्यासाठी त्याच्या खांद्यावर उचलून मदत केली”. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6.8K व्ह्यूज मिळाले आहेत. (spo mohan singh from reasi helped old man lifting him to get corona vaccinated )