Top Recommended Stories

Raghav Chadha Ramp Walk: 'आप'चे आमदार राघव चड्डा यांचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'जलवा', रॅम्प वॉक करत हिरोसारखी एंट्री

Raghav Chadha Ramp Walk: लॅक्मे फॅशन वीक 2022 (Lakme Fashion Week) मध्ये लेटेस्ट शोस्टॉपर कोण होते हे ऐकूण तुम्हाला आश्यचर्य वाटेल. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी हे या शोचे आकर्षण बनले होते.

Updated: March 28, 2022 6:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Raghav Chadha Ramp Walk: 'आप'चे आमदार राघव चड्डा यांचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'जलवा', रॅम्प वॉक करत हिरोसारखी एंट्री
Raghav Chadha Ramp Walk

Raghav Chadha Ramp Walk: लॅक्मे फॅशन वीक 2022 (Lakme Fashion Week) मध्ये लेटेस्ट शोस्टॉपर कोण होते हे ऐकूण तुम्हाला आश्यचर्य वाटेल. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा (Aam Aadmi Party MLA Raghav Chadha) यांनी हे या शोचे आकर्षण बनले होते. लॅक्मे फॅशन वीक 2022 मध्ये चढ्ढा यांनी रॅम्प वॉक करत (Raghav Chadha’s Ramp Walk) उपस्थितांची मने जिंकली. रविवारी पार पडलेल्या लॅक्मे फॅशन शोमध्ये डिझायनर पवन सचदेवसाठी (Pawan Sachdev) ते शोस्टॉपर बनले. रॅम्पवर एंड्री घेताना राघव चढ्ढा यांनी बरगंडी हाय-नेकवर काळे लेदर जॅकेट आणि पॅंट परिधान केली होती. या ड्रेसमध्ये ते खूपच देखणे दिसत होते. त्याचे या शोमधील (Lakme Fashion Show) काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राघव चढ्ढा यांचा रॅम्प वॉक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral video) राघव चड्ढा लॅक्मे फॅशन वीक 2022 च्या मंचावर बरगंडी हाय-नेकसह काळ्या रंगाचे लेदर जॅकेट आणि पॅंट परिधान करून एखाद्या प्रोफेशनल मॉडेलप्रमाणे रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. त्यांची एंड्री होताच उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी तो पंसती केला आहे. यूजर्स यावर चढ्ढा यांचे कौतुक करत मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

You may like to read

बनले सर्वात तरुण राज्यसभा सदस्य

आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते राघव चढ्ढा यांची नुकतीच पक्षाने राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती केली आहे. चढ्ढा आणि आपचे इतर चार उमेदवार गुरुवारी बिनविरोध निवडून आले. 33 वर्षीय राघव चढ्ढा हे सर्वात तरुण राज्यसभा सदस्य बनले आहेत. दिल्लीतील राजेंद्रनगरचे आमदार राघव चढ्ढा यांनी यापूर्वीच दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. पंजाबमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी राघव चढ्ढा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.