नवी दिल्ली : बहीण-भावांचं नातंच (Brother-Sister Relation) खास असतं. दोघंही या नात्यासाठी आपला जीव देखील द्यायला तयार असतात. अशामध्येच रक्षाबंधनच्या (Raksha Bandhan 2021) एक दिवस आधी भाऊ-बहिणींच्या अतुट प्रेमाचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. दोन बहिणींनी आपल्या भावाला अनोखं गिफ्ट (Raksha Bandhan special gift) दिलं आहे. त्यांनी दिलेले हे गिफ्ट भावाला आयुष्यभरासाठी खूपच उपयोगी ठरले आहे. भावाचे लिव्हर म्हणजेच यकृत खराब झाल्यानं त्याचा जीव धोक्यात आला होता. अशामध्ये दोन बहिणींनी आपले अर्धे-अर्धे यकृत भावासाठी दान (Liver Donation) करत त्याचा जीव वाचवला आहे. देशात ही पहिलीच घटना आहे ज्यामध्ये दोन लोकांनी एकाचा जीव वाचवण्यासाठी अर्धे-अर्धे यकृत दान केले आहे. या बहिण-भावाच्या नात्याची कहाणी खूपच प्रेरणादायी ठरत आहे.Also Read - Raksha Bandhan 2021: या आहेत बॉलिवूडमधील सर्वात फेमस बहीण-भावांच्या जोड्या, एकदा फोटो बघाच!

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूमध्ये राहणाऱ्या अक्षतवर (14 वर्षे) गुडगावच्या (Gudgaon) एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. अक्षतच्या बहिणींनी त्याचे प्राण वाचवले आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी (Hospital Doctor) दावा केला आहे की, ‘एखाद्या मुलाचे हे देशातील पहिले यकृत प्रत्यारोपण (Liver transplant) आहे ज्यात दोन लोकांचे अवयव दान करण्यात आले आहे.’ रक्षाबंधन सणाच्या (Raksha Bandhan) एक दिवस आधी अक्षत आणि त्याच्या दोन बहिणी नेहा (29 वर्षे) आणि प्रेरणा (22 वर्षे) यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाच हॉस्पिटलमध्ये या बहीण-भावावर शस्त्रक्रिया (Operation) झाली. नेहा आणि प्रेरणाने अक्षतचे प्राण वाचवण्यासाठी यकृत दान केले. जुलै महिन्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. Also Read - Raksha Bandhan Special Movie: बॉलिवूडच्या या चित्रपटात दाखवलंय बहीण-भावांचं अतुट नातं, रक्षाबंधननिमित्त करा एन्जॉय!

रुग्णालय प्रशासनाने एका निवेदनात सांगितले की, ‘अक्षत एका महिन्यापूर्वी मृत्यूशी लढा देत होता. यकृत निकामी (Liver failure) झाल्यामुळे अक्षत खूपच गंभीर आजाराचा सामना करत होता आणि त्याला काविळ (Jaundice) झाली होती. तो कोमाच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये होता. रुग्णाचे वजन 92 किलो असल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले होते. अक्षतच्या दोन्ही बहिणींचे वजन तुलनेने कमी होते. म्हणून अक्षतचे प्राण वाचवण्यासाठी त्या दोघींच्या अर्ध्या अर्ध्या यकृताची गरज होती. दोघींनीही भावासाठी आपले अर्धे-अर्धे यकृत दान केले. आता अक्षतचे वजन 65 किलो आहे.’ दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर अक्षत आणि त्याच्या दोन्ही बहिणींची प्रकृती वेगाने बरी होत आहे. आता एका महिन्यानंतर तिघेही सामान्य आयुष्य जगत आहेत. Also Read - Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या आधी या देवांना बांधा राखी; जाणून घ्या कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी?