Top Recommended Stories

Russia Ukrain War: 80 वर्षांच्या 'या' युक्रेनियन नागरिकाचे नेटिझन्सकडून कौतुक, देशाला वाचवण्यासाठी सैन्यात व्हायचेय सहभागी!

Russia Ukrain War: सोशल मीडियावर युक्रेनियन नागरिकांशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत.

Published: February 26, 2022 10:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

80 Years Old Man join army
80 Years Old Man join army

Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukrain War) आज तिसरा दिवस आहे. रशियन सैन्यांनी (Russian Army) युक्रेनच्या अनेक भागात प्रवेश केला आहे. राजधानी कीवमध्ये रशियन बॉम्बर्स आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही देशांमधील या युद्धात सैनिकांसोबतच अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सोशल मीडियावर (Social Media) युक्रेनियन नागरिकांशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. आता एका 80 वर्षांच्या युक्रेनियन वृद्धाचे (80 Years Old Man join army) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वृद्धाला आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी युक्रेनियन सैन्यात सहभागी व्हायचे आहे.

Also Read:

You may like to read

80 वर्षांच्या वृद्धाला सैन्यात व्हायचेय भरती –

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आधीच जाहीर केले आहे की सरकार रशियाशी लढण्यासाठी पुढे येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना शस्त्रे आणि प्रशिक्षण देईल. 80 वर्षांच्या वृद्धाचे हे चित्र देखील याचाच एक भाग आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि माहितीनुसार, 80 वर्षीय वृद्धाला (80 Years Old Ukrain Man) रशियाविरुद्ध लढण्यासाठी सैन्यात भरती व्हायचे आहे. @KatyaYushchenko या ट्विटर हँडलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ही वृद्ध व्यक्ती हसतमुखाने सैनिकांना भेटत असल्याचे फोटोत दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या या फोटोची जोरदार चर्चा सुरु असून या वृद्ध व्यक्तीचे कौतुक केले जात आहे.

नेटिझन्स वृद्धाला करत आहे सलाम –

एका 80 वर्षांच्या वृद्धाचा हा फोटो शेअर करताना, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोणीतरी या 80 वर्षांच्या व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे जो सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहे. त्यांच्यासोबत 2 टी-शर्ट, पॅन्टची एक एक्स्ट्रा जोडी आणि टूथब्रश होते. तसंच एक छोटी बॅग होती ज्यामध्ये दुपारच्या जेवणासाठी काही सँडविच होते. ते म्हणाले की ते आपल्या नातवंडांसाठी हे सर्व करत आहेत.’ हा फोटो समोर येताच अनेकजण भावूक होत आहेत तर अनेक जण त्या वृद्ध व्यक्तीला सलाम करत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 10:30 PM IST