Top Recommended Stories

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चिमुकलीचा Video Viral, म्हणाली असं काही पाहून व्हाल भावूक

Russia-Ukraine Crisis: युक्रेन आणि रशिया यांच्यात सोमवारी पाचव्या दिवशी भीषण युद्ध सुरूच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रशियन सैन्य सतत कीव आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करत आहे.

Published: February 28, 2022 3:23 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चिमुकलीचा Video Viral, म्हणाली असं काही पाहून व्हाल भावूक
Russia-Ukraine Crisis

Russia-Ukraine Crisis: युक्रेन आणि रशिया यांच्यात सोमवारी पाचव्या दिवशी भीषण युद्ध (Russia-Ukraine War) सुरूच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रशियन सैन्य सतत कीव (Kyiv, Capital of Ukraine) आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करत आहे. रशियन सैन्याने (Russian military) युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान सोशल मीडियावरून दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे (Stop the war) आवाहन केले जात आहे. या युद्धादरम्यान एका चिमुकलीचा व्हिडिओ (Video of Littel Girl) व्हायरल झाला आहे. यामध्ये ती युद्धग्रस्त युक्रेन (Ukraine) आणि तेथील नागरिकांसाठी प्रार्थना करताना दिसत आहे. या गोड मुलीने शांततेसाठी केलेले आवाहन पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल…

Also Read:

युध्द थांबवण्याचे भावनिक आवाहन

अल्पावधीत, लाखो व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओमध्ये चिमुकली मुलगी म्हणते ‘आम्ही युक्रेन आणि प्रभावित झालेल्या सर्व निष्पाप लोकांसाठी प्रार्थना करत आहोत.’ व्हिडिओला 1.32 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये युद्ध थांबवण्याचे आवाहन करताना सुंदर मुलगी अशा काही गोष्टी बोलते ज्या ऐकून तुम्ही भावूक होईल.

You may like to read

इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील या मुलीचे नाव ब्रिटनी अँड लिली (Brittany & Lily) आहे. व्हिडिओमध्ये मुलगी पुढे म्हणते ‘मला पृथ्वीवर शांतता हवी आहे, पृथ्वीचे तुकडे नाही. आम्ही सर्व भाऊ-बहीण आहोत.” व्हिडिओच्या शेवटी ‘युद्ध थांबवा’ असं आवाहन तिने केले आहे.

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्धात लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले असल्याची माहिती आहे. या युद्धात दोन्ही बाजूंच्या शेकडो सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 3:23 PM IST